Tillu tajpuriya : 92 वार, शरीराची चाळणी अन् रक्ताचं थारोळ! पोलिसांसमोरच घेतला जीव

मुंबई तक

tillu tajpuriya video : तिहार तुरुंगातील सीसीटीव्ही व्हिडीओंनी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या समोर गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची गोगी गँगच्या 8 गुंडांनी धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या केली. या घटनेचे दोन वेगवेगळे व्हिडीओ समोर आले असून, अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

ADVERTISEMENT

tillu tajpuriya cctv video
tillu tajpuriya cctv video
social share
google news

tillu tajpuriya murder news : दिल्लीतील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगात पोलिसांसमोरच हत्याकांड घडलंय. गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची गोगी गँगच्या गुंडांनी हत्या केली. तिहार तुरुंगात घडलेल्या या घटनेचे दोन व्हिडीओ (tillu tajpuriya video) समोर आली असून, यात पोलिसांसमोरच हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. या प्रकरणात तिहार तुरुंग महासंचालकांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकांसह 9 पोलिसांना निलंबित केलं आहे. (tillu tajpuriya original video)

तिहार तुरुंगात 2 मे रोजी टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आली. गँगस्टर टिल्लूवर गोगी गँगमधील 8 गुंडांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गुंडांनी टिल्लू ताजपुरियावर 92 वार केले. टिल्लूवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे दोन वेगवेगळे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहेत.

टिल्लू ताजापुरिया हत्या : तिहार तुरुंगातील पहिल्या व्हिडीओत काय?

तिहार तुरुंगात झालेल्या हत्याकांडानंतर दोन व्हिडीओ समोर आले असून, सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. यात पहिल्या व्हिडीओमध्ये गोगी गँगचे गुंड कसे टिल्लू ताजपुरियापर्यंत पोहोचतात. त्यानंतर सगळ्यांनी मिळून टिल्लूवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हे सगळं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

हेही वाचा >> शरद पवारांच्या ‘हनुमंती’ डावाने अजितदादांचा केला ‘करेक्ट कार्यक्रम?’

हे वाचलं का?

    follow whatsapp