Crime : आधी भांडण झाली, मग गळाच घोटला; नवऱ्याने बायकोला का संपवलं?
Titwala Crime News : बायकोने चारित्र्यावर संशय घेतल्याने नवऱ्याने संतापून तिची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेने टिटवाळा परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे
ADVERTISEMENT
Titwala Crime News : ठाण्याच्या टिटवाळामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका नवऱ्याने (Husband) बायकोची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. माही मोपे (वय 24) असे या मृत महिलेचे नाव आहे. बायकोने चारित्र्यावर संशय घेतल्याने नवऱ्याने संतापून तिची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेने टिटवाळा परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (titwala crime news husband killed wife immoral relatioship thane shocking crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश मोपे आणि त्याची बायको माही मोपे टिटवाळा परिसरात राहात होती. महेश पडघा येथील डी मार्टच्या गोदामात काम करायचा. महेश आणि माही या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे 3 वर्षापुर्वीच दोघांनी लव्ह मॅरीज केले होते. दोघांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं असताना अचानक माहीला महेश मोपेच्या चारित्र्यावर संशय आला होता.
हे ही वाचा : 'आम्ही 115 तरी तुम्हाला..', फडणवीसांनी एका वाक्यात..
खरं तर महेशचे अनैंतिक संबंध सुरु असल्याची माहिती माहीला मिळाली होती. त्यामुळे माहीने या अनैंतिक संबंधाबाबत महेशला विचारले असता दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर अनेकदा याच विषयावरून दोघांमध्ये वादावादी झाली होती. आज सकाळी सुद्धा दोघांमध्ये याच विषयावर भांडणे झाली होती. या भांडणाचा वाद इतका टोकाला गेला की, महेशने माहीचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी टिटवाळा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या हत्येनंतर पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असता, महेशने हत्येची कबुली दिली होती. पण या प्रकरणात माहीच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा : '...आता तुला नक्की पाडणार', पुण्यात मोहोळांविरोधात भाजपमध्ये वाद का उफाळला
महेश आणि माहीने लव्ह मॅरेज केल्याने त्याच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हते. त्यामुळे नेहमी त्यांची घरी भांडणे व्हायची, वादावादी व्हायची. यामुळे सासरच्या मंडळीनेच माहीची हत्या केल्याचा आरोप माहीच्या आई-वडिलांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी माहीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणी पोलिसांनी महेश विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT