Devendra Fadnavis: 'आम्ही 115 तरी तुम्हाला मुख्यमंत्री... आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी..', कदमांना फडणवीसांचं प्रत्युत्तर!

मुंबई तक

Devendra Fadnavis vs Ramdas Kadam: आमच्याकडे 115 आमदार असताना देखील आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

रामदास कदमांचा विषय फडणवीसांनी एका वाक्यात संपवला
रामदास कदमांचा विषय फडणवीसांनी एका वाक्यात संपवला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रामदास कदम यांना प्रत्युत्तर

point

देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

point

जागा वाटपामुळे शिवसेना नाराज?

Devendra Fadnavis vs Ramdas Kadam: मुंबई: 'भाजपने आमचा केसाने गळा कापू नये...' असं विधान करणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, मोजक्या शब्दातच त्यांनी रामदास कदमांचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून बरीच धुसफूस सुरू आहे. अशीही चर्चा आहे की, भाजप शिवसेनेला (शिंदे गट) केवळ 10 ते 12 जागाच देईल. ज्यानंतर काल (6 मार्च) शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप करत जोरदार टीका केली होती. 

रामदास कदम यांच्या टिकेनंतर महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं. याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबईत पत्रकार छेडलं असता त्यांनी रामदास कदमांच्या विधानाला फारसं महत्त्व दिलं नाही. 

'आम्ही 115  आहोत तरी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं. पण अनेकवेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्याकरिता आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि परिपक्व लोकांनी त्या गोष्टी गंभीरतेने घेऊ नये.' अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी यावेळी दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp