Crime : विवाहितेवर सासरा, दिर आणि मामेभावाने आळीपाळीने अत्याचार केला मग...टिटवाळा हादरलं!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

 titwala crime news married women rape bye three people shocking story
३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार व बेदम मारहाण
social share
google news

Crime : बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता टिटवाळ्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच सासऱ्याने, दिराने नंतर मामेभावाने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे वाच्यता करू नये यासाठी तिच्या नवऱ्याने लाठी-काठी, दगड व वीटांनी बेदम मारहाण केली आहे.दरम्यान आता एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर नातेवाईकांकडून सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (titwala crime news married women rape bye three people shocking story) 

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या महितीनुसार, टिटवाळा नजीक एका गावात एक पती-पत्नी आपल्या दोन मुलांसोबत राहतात. पती-पत्नी विटभट्टीवर काम करून आपल्या कुटुंबियांची उदरनिर्वाह करत होते.  घटनेच्या दिवशी 6 सप्टेंबरला विवाहित महिलेचा नवरा हा बाजार गेला होता. यावेळी 30 वर्षीय महिला घरात एकटी असल्याचे पाहून रात्री दहा वाजेच्या सुमारास सासरा, दिर आणि एक अल्पवयीन नातेवाईक झोपडीत प्रवेश केला.आणि तिघांनी मिळून महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला. या घटनेनंतर नराधम पळून गेले होते. 

हे ही वाचा : Amit Shah : महायुतीचा विधानसभेचा मेगाप्लान ठरला? शहांसोबतच्या बैठकीची Inside Story

ही घटना घडल्यानंतर ज्यावेळेस नवरा घरी आला तेव्हा पीडित विवाहितेने बलात्काराची घटना आपल्या नवऱ्याला सांगितली. मात्र यावर तिच्या नवऱ्याने लाठी-काठी, दगड व वीटांने तिला बेदम मारहाण करत घडलेली घटना कोणालाही सांगू नको असा दम भरला. यानंतर महिलेची अवस्था गंभीर असल्याने तिला तातडीने ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर जवळपास दोन दिवस उपचार करण्यात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अखेर या प्रकरणात महिलेने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर पती, सासरा, आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे तर एका अल्पवयीन आरोपीची चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : Mumbai Crime : टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोन गणेशभक्तांना उडवलं, मुलुंड Hit And Run ची Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT