Amit Shah : महायुतीचा विधानसभेचा मेगाप्लान ठरला? शहांसोबतच्या बैठकीची Inside Story

देव कोटक

ADVERTISEMENT

amit shah, amit shah at sahyadri guest bjp coar commitee meeting vidhan sabha election plan maharashtra assembly election 2024
सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या कोअर कमिटीसोबत बैठक पार पडली
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमित शाहांसोबतची बैठक संपली

point

सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली बैठक

point

बैठकीत विधानसभेची रणनिती ठरली

Amit Shah at Sahyadri Guest Bjp Meeting : आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सूरू केली आहे. त्यानुसारच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची  सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या कोअर कमिटीसोबत बैठक पार पडली आहे. या बैठकीत शाहांनी भाजप नेत्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली आहे. या चर्चेअती भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी मेगाप्लान तयार केल्याची तयारी समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीची इनसाईड स्टोरी काय आहे? ती जाणून घेऊयात. (amit shah at sahyadri guest bjp coar commitee meeting vidhan sabha election plan maharashtra assembly election 2024) 

ADVERTISEMENT

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. आज अमित शाह यांचा ताफा मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाला होता. यावेळी अमित शाह यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे असे भाजपच्या कोअर कमिटीतले नेते उपस्थित होते. या नेत्यांसोबत विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाल्याची सुत्रांची माहिती आहे. 

हे ही वाचा :Maharashtra Assembly Election Survey : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? मविआची झोप उडवणारा सर्व्हे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव या विषयावर मंथन झाल्याची चर्चा आहे.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. नेमक्या कुणी किती जागा लढाव्या? यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

तसेच राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. या योजनेसह केंद्राच्या योजनांचा प्रचार कसा करायचा? याबाबतही मार्गदर्शन केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या चुका टाळण्याचाही सल्ला शहांनी नेत्यांना दिल्याची माहिती आहे. 

 ''बॉम्बे नको मुंबई हवी''

बॉम्बे नको मुंबई नाव हवं आहे ही मागणी ज्यावेळी केली गेली. मी देखील बॉम्बे नको मुंबई हवी ही मागणी करणारा होतो. त्यावेळी मुंबई समाचारने हेडलाईन केली होती की मुंबईच हवं. नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार आहोत. आम्हाला माहिती आहे की याला प्रचंड विरोध होईल, मात्र आम्ही तरी देखील हा निर्णय घेणार आहोत", असं गृहमंत्री अमित शाह मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा :Mumbai Crime : टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोन गणेशभक्तांना उडवलं, मुलुंड Hit And Run ची Inside Story

मुंबई समाचारबाबत नरेंद्र मोदी यांच्याकडून कळलं. गुजरातमधील एक प्रमुख दैनिक 200 वं वर्ष सुरू आहे. याचा अभिमान आहे. कोणत्याही संस्थेला 200 वर्ष चालवणं अवघड आहे. त्यात जर तो पेपर असेल तर त्यापेक्षा अवघड आहे. पत्रकारितेत एक गुजराती व्यक्ती काम करत असेल तर तो कशा प्रकारे चांगलं काम करू शकतो याच उदाहरणं मुंबई समाचार असल्याचेही शहा यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT