Sharad Mohol : भावाची हत्या झाली त्याच ठिकाणी ठोकलं शरदला, पुण्यातील गँगवॉरचा इतिहास काय?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Pune Murder: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Pawar) कोथरुड परिसरात तिघा हल्लेखोरांनी बाईकवरून येऊन अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर सह्याद्री रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळ पुण्यातल्या मोहोळचा गँगचा सूत्रधार होता. ज्या ठिकाणी त्याचा भाऊ संदीप मोहोळची (Sandip Mohol) हत्या झाली त्याच ठिकाणी शरद मोहोळचीही हत्या (Murder) करण्यात आली. पण, यानंतर पुण्यात गँगवार (Gangwar) भडकणार का? पुण्यात इतकं गँगवार का वाढला? पुण्यात गँगवारचा जन्म कसा झाला? त्याचाच हा वृत्तांत.

जमिनीच्या किंमती वाढल्या

ही गोष्ट आहे साधारण 80 च्या दशकातील. पुण्यात दोन गँग उदयास आल्या होत्या. त्यावेळी गुन्ह्याचं स्वरुप मटके, खंडणी, अवैध मालमत्ता अशा प्रकारचे होते. पुढे 90 च्या दशकात पुण्याचा विस्तार होऊ लागला तशी पुण्याची जुनी ओळख पुसली जाऊ लागली. पुणे हे आयटी हब बनत होतं. मोठमोठ्या कंपन्या येत होत्या. त्यासाठी जमिनीची गरज भासू लागली. पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जमिनीच्या किंमती वाढल्या. या परिसरात ज्यांच्या जमिनी होत्या ते कोट्यधीश झाले. यातून आपण कोट्यधीश होऊ शकतो ही भावना अनेकांच्या मनात आली.

हे ही वाचा >> शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकिलांचा हात, हत्याकांडात नेमका काय होता रोल?

खऱ्या टोळीयुद्धाला सुरुवात

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्योगपतींना जमीन हवी होती आणि ती मिळवून देण्यासाठी एजंट्सची संख्या वाढू लागली. याच जमिनी मिळवून देण्यासाठी दादागिरी, गुंडगिरीचा वापरही झाला आणि त्यातूनच पुण्यात गँगवारचा जन्म झाला. यामध्ये पहिली ठिणगी पडली ती 2005 मध्ये. मारणे टोळीतल्या अनिल मारणेवर हल्ला करण्यात आला आणि त्याचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. त्यानंतर 2006 ला मारणे टोळीच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती आणि यानंतर खऱ्या टोळीयुद्धाला सुरुवात झाली.

संदीप मोहोळ सरपंच झाला

ADVERTISEMENT

संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातला रहिवासी होता. त्याला आखाडा आणि पहिलवान या सगळ्या गोष्टींची आवड होती. जमिनी व्यवहारामध्ये पैसा आहे हे संदीप मोहोळ लहानपणापासून जाणून होता. तो 19 व्या वर्षी तो टोळीयुद्धात सक्रीय झाला. त्यानंतर जमिनींसाठी धमकावणे, बळाचा वापर करणे अशा गुन्ह्यांमध्ये संदीप मोहोळचं नाव पुढे येऊ लागलं. पैसा आला आणि त्यापाठोपाठ त्याच्या गावची सत्ताही मिळाली. संदीप मोहोळ सरपंच झाला.

ADVERTISEMENT

मारणेच्या हत्येनं गँगवॉर

राष्ट्रवादीत प्रवेश करून माथाडी कामगारांचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला. त्याने मारणे टोळीचे दोन सदस्यांची हत्या केली होती. त्यामुळे मारणे टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती. मारणे टोळीला अनिल मारणेच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. अनेक हल्ल्यातून संदीप मोहोळ वाचला. पण, मुठा गावातून कोथरुडला येत असताना मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली. आता ज्या जागी शरद मोहोळला मारलं त्याच जागी त्याचा भाऊ संदीप मोहोळची हत्या झाली होती. संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळकडे या गँगची सूत्र आली होती. त्यावेळी 2010 मध्ये मारणे गँगच्या किशोर मारणेची पुण्यात मोहोळ गँगकडून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.

तुरुंगातही गुंडागर्दी

या प्रकरणात 7 आरोपींना जन्मठेप झाली. त्यापैकी 4 जण निर्दोष सुटले. यामध्ये शरद मोहोळलाही शिक्षा झाली होती. शिक्षा होऊन तुरुंगात गेल्यावरही शरद मोहोळ स्वस्थ बसला नाही. त्याने येरवडा तुरुंगात इंडियन मुजाहिदीनचा सदस्य मोहंमद कथिल सिद्दिकीचा खून केला. त्यानंतर खुनाचे पुरावे नष्ट केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. या प्रकरणातील आरोपी मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. किशोर मारणे हत्या प्रकरणात शरद मोहोळ तुरुंगात होता. मात्र या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

राजाकरणाचे वेध लागले

गुंडगिरी करत असतानाच शरद मोहोळला त्याचा भाऊ संदीप मोहोळसारखेच राजाकरणाचे वेध लागले होते. फरक फक्त इतकाच होता की संदीप मोहोळने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आणि शरद मोहोळच्या पत्नी स्वाती यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर शरद मोहोळ पत्नीसोबत अनेक सामाजिक उपक्रमात सक्रीय झाला होता. त्याचा भाऊ संदीप मोहोळची ज्या कोथरुडममध्ये हत्या झाली होती तिथेच शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या झाली. आता शरद मोहोळवर हल्ला कोणी केला? हा हल्ला गँगवारमधून झाला का? हे तपासात समोर येईलच.

हे ही वाचा >>असा झाला शरद मोहोळचा घात, फुलप्रूफ प्लॅन, इनसाईड स्टोरी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT