अकोला हादरला! चौथीतील 4 विद्यार्थिनींवर शिक्षकच दररोज करायचे लैंगिक अत्याचार
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांनी चार विद्यार्थिनींवर सतत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थिनींवर दोन शिक्षकांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणाने अकोला जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 4 एप्रिल रोजी विद्यार्थ्यीनींनी होत असलेल्या लैंगिक शोषणाबद्दल मौन सोडलं आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शी टाकळी तालुक्यात ही घटना घडली आहे. तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळा असून, याच शाळेत हा धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार घडला आहे.
चार मुलींवर दोन शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार प्रकरण काय?
बार्शी टाकळी तालुक्यात एका गावात घडलेल्या प्रकाराबद्दल मिळालेली माहिती अशी की, चौथ्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर शाळेत कार्यरत असलेले दोन शिक्षक अश्लील चाळे करत होते. दरम्यान, मुली एकट्या असल्याचं पाहून दोन्ही शिक्षकांनी मुलींवर लैंगिक अत्याचार केले. शिक्षकांकडून वारंवार विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात येत होते.
हे वाचलं का?
भेदरलेल्या मुलींनी शाळेत जाणे सोडले अन्…
ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकच नराधमाप्रमाणे कृत्य करत असल्याने चारही विद्यार्थिनींनी भेदरून गेल्या. शिक्षकांकडून केले जाणारे अश्लील चाळे आणि लैंगिक छळाला कंटाळून त्यांनी शाळेत जाणे बंद केले. मुलींनी शाळेत जाणे बंद केल्याने त्यांच्या पालकांनी त्यांच्याकडे विचारणा केली.
वाचा >> पुण्यात क्रूर कांड, अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध? दिराने पळवून आणलं अन् नंतर वहिनीलाच…
पीडित चार मुलींपैकी एका विद्यार्थिनीने शिक्षकांकडून सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराची आपबीती सांगितली. एका विद्यार्थिनीने तिच्या आईकडे हा प्रकार सांगितल्यानंतर चौघींच्याही कुटुंबांच्या पायाखालीच जमीनच सरकली.
ADVERTISEMENT
कुटुंबीयांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात चारही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी शाळेतील शिक्षकाकडून सुरू असलेल्या अत्याचारांची कहाणी सांगितली. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना ठाण्यात आणले.
ADVERTISEMENT
शिक्षकांविरुद्ध गुन्हा
विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुलींच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षक राजेश रामभाऊ तायडे (वय 45), सुधाकर रामदास ढगे (वय 53) (दोघेही राहणार अकोला) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे आता पालक चिमुरड्यांना शाळेत पाठवायलाही घाबरत आहेत.
विद्यार्थिनींना एकटं पाहून करायचे कृत्य नंतर द्यायचे धमकी
कमी पटसंख्या असलेल्या या शाळेवर दोन शिक्षक आहेत. दोघेही शिक्षक अकोला येथून ये-जा करतात. पीडित मुलींना एकट्यात बोलावून अश्लील चाळे केल्यानंतर कुणालाही सांगू नका, अशी धमकीही शिक्षक देत होते. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुले व मुली मिळून 9 पटसंख्या असल्याचे समजते. या 9 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हे सुधाकर ढगे आणि राजेश तायडे हे दोन शिक्षक कार्यरत होते.
वाचा >> प्रेयसीचे दुसऱ्यावर जडलं प्रेम, नंतर…; बॉयफ्रेंडच्या कृत्याने चिंचवड हादरलं!
दोघेही शाळेमध्ये दररोज येत नाहीत. एका दिवशी एकजणच येतात. कमी विद्यार्थीसंख्या त्यातही काही विद्यार्थी गैरहजर असतात. त्यामुळे इथे काही मुलींना एकटे पाहून हे दोन्ही शिक्षक त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचे असा आरोप आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT