Crime : आधी पार्टी केली नंतर गोळी घातली, उल्हासनगरमध्ये काय घडलं?
महेशची ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा अंदाज टिटवाळा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत काही तरूणांची पार्टी सुरू होती. या पार्टी दरम्यान अचानक एक तरूण मध्येच उठला आणि त्याने हवेत फायरिंग केली. या फायरिंग दरम्यान एक गोळी त्याच्याच साथीदाराला लागल्याची घटना आता घडली आहे. ज्यामुळे त्याच्या साथीदाराचा (Boy Dead) जागीच मृत्यू झाला आहे. महेश जानू उर्फ राजन हेडकर (वय 20) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर मृत तरूणाचे साथिदार घटना स्थळावरून फरार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करित आहेत. (cccccculhasnagar crime news boy firing killed her friend shocking crime story ulhasanagar mharal village)
ADVERTISEMENT
उल्हासनगरच्या (Ulhasanagar) म्हारळ गावात ही घटना घडली आहे. या घटनेत म्हारळ गावातील एका खाणीच्या ठिकाणी हे तरूण पार्टीला गेले होते. साधारण 15 ते 20 तरूण या पार्टीत सहभागी झाले होते.या पार्टीज मजा मस्ती सूरू असताना एक तरूण मध्येच उठतो आणि बंदूक काढून हवेत फायरिंग करतो. साधारण दोन राऊंड फायरिंग हा तरूण त्याच्या बंदूकीतून करतो. त्यानंतर एक गोळी तो थेट महेश जानूच्या छातीतच मारतो. ज्यामुळे महेशचा जागीच मृत्यू होतो.
हे ही वाचा : Mla Disqualification : शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्री कोण? भाजपचा प्लॅन-बी काय?
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोन राऊंड फायरिंग हवेत करतो.त्यानंतर तिसरी गोळी तो थेट महेशच्या छातीत मारतो अशी माहिती आहे. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले आहे.या पार्टीत 15 ते 20 तरूण सहभागी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांना या घटनेचा माहिती देण्यात आली होती.
हे वाचलं का?
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी घटनास्थळाची तपासणी करून मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला होता. महेशची ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा अंदाज टिटवाळा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा : Mla Disqualification : राहुल नार्वेकर शिंदे-ठाकरेंना देणार धक्का, कसा असणार निकाल?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT