अतिक अहमदचा वकील फोनमधील ‘त्या’ गोष्टीमुळे अडकणार! असदच्या मोबाईलमध्ये काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mobile chats of Asad, who was killed in a police encounter, and lawyer Khan Sulat Hanif have come to light
Mobile chats of Asad, who was killed in a police encounter, and lawyer Khan Sulat Hanif have come to light
social share
google news

Umesh Pal Murder :

ADVERTISEMENT

उमेश पाल हत्या प्रकरणात आता वकील खान सुलत हनिफची भूमिकाही समोर आली आहे. पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला अतीक अहमदचा मुलगा असद आणि अतीक अहमदचा वकील खान सुलत हनिफ यांचं मोबाईल चॅट्स समोर आलं आहे. खान सुलत हनिफने उमेश पाल यांचा फोटो 19 फेब्रुवारीला असदला पाठवला होता. (Mobile chats of Asad, who was killed in a police encounter, and lawyer Khan Sulat Hanif have come to light)

असदनेच उमेश पाल यांचे हे फोटो इतर शुटर्सना पाठवली. त्यानंतर 24 फेब्रुवारीला उमेश पाल यांची हत्या करण्यात आली, दरम्यान, आता उमेश पाल खून प्रकरणात हनीफ यालाही पोलिसांनी आरोपी बनवले आहे. उमेश पालच्या अपहरण प्रकरणात सौलत हनिफ याला यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो नैनी कारागृहात बंद आहे.

हे वाचलं का?

अतिक अहमदच्या मुलांच्या वागण्या-बोलणात बदल :

ज्या पद्धतीने अतिक आणि अशरफची हत्या झाली आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी असदचा एन्काउंटर केला, त्यानंतर अतीकच्या दोन्ही मुलांच्या वागण्यात बदल झाला आहे. अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर लखनौ तुरुंगात बंद असलेल्या उमरची देहबोली बदलली आहे. असदच्या एन्काउंटरची बातमी उमर अहमदला मिळताच तो अचानक बॅरेकमध्ये गुडघ्यावर पडला आणि वर बघत प्रार्थना करू लागला. दुसरीकडे, अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येची खबर रविवारी त्याला मिळाली. त्यावर त्याने लगेच विचारले की हत्या कोणी केली? त्याना पकडले का? त्यांचाही एन्काऊंटर झाला आहे का?

Girl Murder : परीक्षा देऊन निघाली होती घरी, भरबाजारात दोन तरुणांनी…

अलीने जेवण सोडलं; तब्येत बिघडली

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर मुलगा उमरच्या वागण्यात बदल झाला आहे. तर दुसरा मुलगा अलीने तुरुंगात खाणेपिणे सोडून दिले आहे.अलीला बराकीतून बाहेर काढून रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ADVERTISEMENT

शाईस्ता, आयेशा नूरी आणि जैनब फरार :

उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि अतिक अहमदची बायको शाइस्ता परवीनचा पोलीस कसून शोध घेत आहेत. प्रयागराज ते कौशांबीपर्यंत पोलीस शाइस्ताचा शोध घेत आहेत. आतापर्यंत 200 हून अधिक घरांची झडती घेण्यात आली आहे. संशयाच्या आधारे 2 डझनहून अधिक महिलांची चौकशी केली, मात्र शाइस्ता सापडलेली नाही. उमेश पाल हत्या प्रकरणापूर्वी 19 फेब्रुवारीला शाइस्ता परवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती.

ADVERTISEMENT

शाइस्ताशिवाय पोलीस अतीक अहमदची बहीण आयेशा नूरी आणि अतीकचा भाऊ अशरफची पत्नी झैनब फातिमा यांचाही शोध घेत आहेत. उमेश पाल हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही आरोपी बनवले आहे. उमेश पाल हत्याकांडात सहभागी असलेला शूटर साबीरही तिच्यासोबत दिसत होता. साबीरवर 5 लाख आणि शाइस्तावर 50 हजारांचे बक्षीस आहे. अतिकच्या काही नातेवाईकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतिक अहमदचा उजवा हात समजला जाणारा त्याचा गुंड असद कालिया यालाही अटक करण्यात आली आहे.

Crime News : शेजाऱ्याच्या घरात कुलरमध्ये सापडला मुलाचा मृतदेह, तारेने बांधलेले हात-पाय

कुठे आहे गुड्डू मुस्लिम?

याशिवाय गुड्डू मुस्लिम बॉम्बर हा पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड बनला आहे. गुड्ड मुस्लीमने 24 फेब्रुवारी रोजी उमेश पालची हत्या केल्यानंतर आतापर्यंत 5 लोकेशन्सवर गेला होता. पहिले- मेरठ, दुसरे- झाशी, तिसरे- नाशिक, चौथे- कर्नाटक आणि आता ओडिशा. सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की त्याचे शेवटचे ठिकाण आता ओडिशामध्ये सापडले आहे. त्याचे लोकेशन ट्रेस करून एसटीएफची टीम पुरी येथे पोहोचली, मात्र अधिकारी पोहोचण्यापूर्वीच गुड्डू बेपत्ता झाला होता.

800 फोन नंबर अचानक बंद झाला :

दरम्यान, अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर पोलिस पथकांसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. शनिवारी अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर अतीकच्या सुमारे 800 गुंडांनी फोन बंद केला आहे. सर्व 800 नंबर्सवर पोलीस पाळत ठेवत होते. आता बंद झालेल्या क्रमांकांची तपासणी करून त्यांचे कॉल डिटेल्स घेतले जात आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT