‘बॉलिवूड’मध्ये अंडरवर्ल्डचा पैसा, महादेव बेटिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
महादेव गेमिंग-बेटिंग ॲप प्रकरणी आता बॉलीवूडमधील प्रॉडक्शन हाऊसवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईत अनेक बड्या कलाकारांचा समावेश असून रणबीर कपूरसर कपिल शर्मालाही समन्स बजावण्यात आले आहे. आता थेट प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
ADVERTISEMENT

Mahadev Betting Scam: गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच ईडीकडून (Enforcement Directorate) बॉलीवूडमध्ये मोठी कारवाई करण्यात येत आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात रणबीर कपूर, हुमा कुरेशी, कपिल शर्मा आणि हिना खान (Ranbir Kapoor, Huma Qureshi, Kapil Sharma and Hina Khan) या कलाकारांना समन्स बजावण्यात आले असून याप्रकरणी अजूनही मोठी कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. महादेव बेटिंग प्रकरणात आता थेट बॉलीवूड प्रॉडक्शन हाऊसवर (Bollywood Production House) छापेमारी सुरु केली आहे. या छापेमारीतून बॉलीवूडमधील प्रॉडक्शन हाऊसला अंडरवर्ल्ड पैसा पुरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीने शुक्रवारी कुरेशी प्रॉडक्शनसह अंधेरीतील इतर पाच ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे.
चंद्राकर-उप्पल यांचा पैसा
ईडीने कारवाई केल्यानंतर कुरेशी प्रॉडक्शन हाऊसचे चित्रपट निर्मितीसाठी महादेव ॲप चालवणारे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून पैसा पुरवला गेल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई करण्यात आल्यानंतर कुरेशी प्रॉडक्शन हाऊसकडून एका टॉप बॉलीवूड स्टारला घेऊन बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट प्रादेशिक भाषेत बनवला जात असून तो इतर अनेक भाषांमध्ये डब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा >> खुर्चीला हात-पाय बांधून गळा आवळला, संभाजीनगरात 70 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या
आर्थिक व्यवहारांची चौकशी
अंधेरी आणि इतर काही ठिकाणी छापेमारी केल्यानंतर वसीम कुरेशी आणि तबस्सुम कुरेशी या दोघांकडून हे प्रॉडक्शन हाऊस चालवले जात असल्याचे सांगण्यात आले. वसीम कुरेशीची सध्या चौकशी सुरु असून त्याच्या संदर्भातील सर्व कागदपत्रं ताब्यात घेऊन आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.
रणबीरसह अनेकांवर कारवाई
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून आता सातत्याने छापे टाकले जात आहेत. रणबीर कपूरसह अनेक मोठ्या बॉलीवूडमधील कलाकारांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता असल्याने यामुळे बॉलीवूड हादरले आहे. सौरभ चंद्राकरने फेब्रुवारी 2023 मध्ये दुबईमध्ये लग्न केले होते. यावेळी त्याने लग्नात 200 कोटी रुपये उधळले होते. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील असून त्याने आणि त्याचा मित्र रवी उप्पल या दोघांनी ‘महादेव ऑनलाइन ॲप’ सुरू केले. या ॲपवर ऑनलाइन बेटिंग केली जाते. त्याच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक बडे कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नाच्या भव्यदिव्य आणि प्रचंड खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर होते. तर त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचेही मोठे नेटवर्क उघड झाले आहे.