अनैसर्गिक सेक्सच्या वादातून 55 वर्षीय पुरुषाचा गळाच चिरला, नेमकं घडलं काय?
अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या वादातून एका 55 वर्षीय पुरुषाची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना ही ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये घडली आहे. जाणून घ्या नेमकी घटना काय घडली.
ADVERTISEMENT
Crime News: अंबरनाथ: अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या वादातून 55 वर्षीय व्यक्तीची त्याच्याच सहकाऱ्याने राहत्या घरातच गळा चिरून निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. ही खळबळजनक घटना अंबरनाथ (Ambernath) पूर्वेतील चिखलोली पाड्यात असलेल्या मगर चाळीतील एका खोलीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. कृष्णानंद मुनियन (वय 55 वर्ष) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (unnatural sex dispute 55 year old man murder ambernath crime alcohol party marathi news)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्वेतील चिखलोली पाड्यात असलेल्या मगर चाळीत मृतक कृष्णानंद हा राहत होता. तो अंबरनाथ एमआयडीसीमधील एका कंपनीत फेब्रिकेशनचे काम करत होता. त्यातच रविवारी 19 जून रोजी सायंकाळच्या सुमारास मृतक कृष्णानंद हा कंपनीतून येताना सोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याला दारू पाजण्याच्या बाहण्याने घरी घेऊन आला होता. त्यानंतर घरातच दोघांनी दारू पार्टी केली. मात्र पार्टी करताना रात्री उशीर झाल्याने मृतकने आरोपीला मुक्काम करण्यास भाग पाडले.
त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास मृत कृष्णानंद याने सोबत आलेल्या सहकाऱ्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जोरजबरदस्ती करू लागला. तर आरोपीला अचानक घडत असलेल्या त्या घटनेचा राग आला. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन सोबत आलेल्या त्या आरोपी सहकाऱ्याने त्याच्याच घरातील धारधार चाकू घेऊन थेट कृष्णानंद याचा गळाच चिरला. यानंतर आरोपी घाईघाईत घराबाहेर पडला आणि त्याने घराला बाहेरून कडी लावली आणि तिथून पसार झाला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> ‘या’ देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिला का आहेत लठ्ठ, का घडतंय असं?
नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास मृत कृष्णानंदच्या शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेने नळाचे पाणी भरण्यासाठी दार ठोठावून कृष्णानंदला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ झाला तरी दार उघडले नाही. त्यावेळी शेजाऱ्याच्या मदतीने तिने दार उघडून प्रवेश केला असता कृष्णानंदचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळून आला.
त्यामुळे या घटनेची माहिती सोमवारी 19 जून रोजी सकाळच्या सुमारास पोलिसांना मिळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी श्वान पथकासह दाखल होऊन पंचनामा करत कृष्णानंदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलं.
ADVERTISEMENT
त्यानंतर शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर काही तासात शिवाजीनगर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. यावेळी त्या संशयित व्यक्तीनेच हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘तो’ Video पाहिला, 700 किमी प्रवास करत आला अन् घटस्फोट घेतलेल्या बायकोला…
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कृष्णानंद हा आरोपीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे झालेल्या वादातूनच आरोपीने ही हत्या केल्याचे सांगितले. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या शिवाजीनगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT