Seema Haider: पाकिस्तानी सैन्याशी खास कनेक्शन, ATSच्या तपासात सीमा हैदरबाबत धक्कादायक उलगडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

up ats interrogation of seema haider and sachin meena revealed many things
up ats interrogation of seema haider and sachin meena revealed many things
social share
google news

पाकिस्तानातून प्रेमाखातर भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) आता भारतीय तपास यंत्रणाच्या रडावर आली आहे. इंटेलिजेंन्स ब्युरो (IB) पासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि यूपी एटीएसची (UP ATS) टीम सीमा हैदरचा सखोल तपास करते आहे. भारतीय तपास यंत्रणा नोएडापासून काठमांडूपर्यंत आणि काठमांडू ते शारजाह आणि कराचीपर्यंत सीमा हैदरचा संपूर्ण भारतातील प्रवेशाच्या रूटची तपासणी करते आहे. इतकेच नाही तर युपी एटीएसने सीमाची तब्बल 6 तास चौकशी केली होती. या चौकशीत सीमाचा जबाब, तथ्य, पुरावे आणि कागदपत्रे जुळत नाही आहेत. त्यामुळे सीमा हैदरबाबतचा संशय आणखीणच बळावत चालला आहे. (up ats interrogation of seema haider and sachin meena revealed many things)

भाऊ सैन्यात तर काका लष्कर अधिकारी

सीमा हैदरच्या भुतकाळात पाहिलं तर तिची चार मुले आणि नवरा गुलाम हैदर दिसतो. आणि त्यापलिकडे गेल्यास सीमाचे सासर आणि माहेर येते. सीमाच्या माहेरातील काही गोष्टी तिच्यावर मोठा संशय उपस्थित करतात. कारण सीमा हैदरचा भाऊ आसिफ पाकिस्तानी रेंजर्सच्या तुकडीसोबत कराचीत तैनात आहे. तर सीमाचे काका पाकिस्तानी लष्करात अधिकारी आहेत. त्यामुळे या दोन्हीही गोष्टी सीमावर संशय घेण्यास पुरेशा आहेत.

ओळखपत्रात घोळ

सीमा हैदर ज्य़ा गोष्टी शपथ घेऊन सांगते त्यातल्या काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. सीमा असा दावा करते की, 2014 ला ती 19-20 वर्षांची होती. तिने 10 दिवसांपुर्वीच तिच्या नवऱ्याचे घर सोडले. तिच्या नवऱ्याकडचं कुटुंब लालची होते. जबरदस्ती तिचे लग्न एका लोफरटाईप व्यक्तीशी केले जात होते. मर्जीविरूद्ध लग्न टाळण्यासाठी तिने नवऱ्याचे घर सोडले होते. सीमा हैदरने केलेल्या या दाव्याचा आता यूपीची एटीएस टीम तपास करते आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Seema Haider : बॉर्डरवर मेकअप, मुलांना बोलण्याची ट्रेनिंग, सीमाच्या चौकशीत IBचे गंभीर खुलासे

सीमा हैदरच्या पाकिस्तानी कागदपत्रातून सर्वात मोठा प्रश्न तिच्या वयावरून उपस्थित होत आहे. सीमाने तिचे ओळखपत्र 2022 ला बनवले होते. याचाच अर्थ 2 वर्षाच्या मैत्रीनंतर सचिन मीना सीमा हैदरच्या प्रेमात पडला होता.त्यानंतर सीमाने हे कागदपत्र बनवले होते. या कागदपत्रात सीमाची जन्मतारीख 1 जानेवारी 2022 लिहली आहे. या कागदपत्रानुसार सीमाचे वय 21 वर्ष आहे. या दोन्ही कागदपत्रानुसार सीमाच्या वयात 6-7 वर्षाचा फरक आहे.

विशेष म्हणजे,सीमा या कागदपत्रातील वयाच्या फरकावर उत्तर देऊ शकली नाही आहे. त्यामुळे सीमाने पाकिस्तानात खोटे कागदपत्रे बनवले आहेत का? असा संशय उपस्थित होतो. याचसोबत सीमा हैदर जवळ भारतातील अनेक खोटी कागरदपत्रे आढळली आहेत. आता तपास यंत्रणा ही कागदपत्रे सीमाने नेमकी कोणाची मदतीने बनवून घेतली आहेत, याचा तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

संशय निर्माण करणारे 10 प्रश्न

1) 4 मुलांची आई स्वत:ला पाकिस्तानच्या लहान शहरातली रहिवाशी म्हणते, मग ती PUBGवर दिवसभर व्यस्त कशी असते?
2) पाचवी पास सर्वसामान्य महिलेकडे दोन पासपोर्ट कशासाठी आहेत?
3) आपल्या 4 मुलांना सोडून सचिनला भेटायला नेपाळला कशी आली?
4)दुसऱ्यांदा पाकिस्तानी सीमा ओलांडून परतल्यावर चार मुलांसाठी नवीन पासपोर्ट बनवून ती कशी परतली?
5) सीमाकडे इतके पैसै आले कुठून? घर विकल्याचे सीमा सांगते. पण पाकिस्तानमध्ये संपत्तीत महिलांना इतके अधिकार आहेत का?
6)नवऱ्याच्या नकळत तिने घर कसे विकले?
7)सीमा दुबईला जाते आणि पाकिस्तानी पैशाना दिरहममध्ये बदलते आणि दुबईत आरामात हॉटेल आणि कॅबची बुकींग कशी करते.
8) घुसखोरीच्या आरोपाखाली अटक होऊन सुद्धा ती इतकी शांत का दिसते?
9) सीमाने तिचा आणि तिच्या चार मुलांचे डुप्लिकेट आधारकार्ड कसे बनवले?
10) पाकिस्तानमध्ये ज्या फोनचा वापर केला होता, त्यामधील एकही फोन ती भारतात का घेऊन आली नाही. नेपालमध्ये तिने इतर व्यक्तीच्या हॉटस्पॉटच्या आधारावर व्हॉट्सअॅप कॉल केले. तसेच पाकिस्तानात पर्सनल लॅपटॉप का सोडून आली?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : फेसबुकवर मैत्री, प्रेम.. अन् पाकिस्तानचा तुरुंग,11 वर्षापूर्वी मुंबईच्या तरूणासोबत काय घडलेलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT