आधी नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर पेट्रोल ओतून जाळले; बायको का उठली जीवावर?
पत्नीने आपल्या झोपलेल्या नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळले. बागपत जिल्ह्यातील या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामागे एक धक्कादायक कारण असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या
नंतर पेट्रोल ओतून जाळले
बायको का उठली जीवावर?
Crime News : एका अनैतिक संबंधाचा शेवट इतका भयंकर होईल, याचा कोणी विचारही केला नसेल. एका पत्नीने आपल्या पतीला आधी झोपेच्या गोळ्या देऊन झोपवले आणि नंतर पेट्रोल ओतून जिवंत जाळले. या घटनेत 80 टक्के भाजलेल्या पतीची तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधातून पत्नीने हे भयंकर कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
तरुणासोबत प्रेमप्रकरण
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात घडली आहे. येथील रहिवासी असलेला राजीव त्याची पत्नी निशा हिच्यासोबत राहत होता. मात्र, संसाराच्या चार भिंतींच्या आत पत्नी निशाचे स्वतःच्याच शेजारी राहणाऱ्या विक्रांत नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. या अनैतिक संबंधांची कुणकुण राजीवला लागली होती. तो या नात्याला वारंवार कडाडून विरोध करत असे. त्याचा हाच विरोध निशा आणि तिचा प्रियकर विक्रांत यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरला होता.
हे ही वाचा : सिंधुदुर्ग : तरुण तुफान नाचला, स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी अन् सगळं संपलं VIDEO
झोपलेल्या नवऱ्याला जिवंत जाळले
अखेर हा अडथळा दूर करण्यासाठी 20 जूनच्या रात्री निशा आणि विक्रांत यांनी एक भयंकर कट रचला. ठरलेल्या योजनेनुसार, निशाने सर्वात आधी आपला पती राजीव याला झोपेच्या गोळ्या दिल्या. राजीव गाढ झोपेत गेल्यानंतर निशाने आपला प्रियकर विक्रांतला घरात बोलावले. त्यानंतर क्रूरतेची सर्व हद्द पार करत दोघांनी झोपलेल्या राजीवच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि त्याला आग लावली. आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळणाऱ्या राजीवच्या किंकाळ्या ऐकून कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 80 टक्क्यांहून अधिक भाजलेल्या राजीवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे सलग सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर राजीवने उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला आणि पत्नीच्या विश्वासघाताचे दुःख सोबत घेऊन त्याने या जगाचा निरोप घेतला.
हे ही वाचा : अहिल्यानगर : बायकोचे गावातल्या परपुरुषाशी अनैतिक संबंध, नवऱ्याचं भयंकर पाऊल
हत्येचा गुन्हा दाखल
या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पत्नी निशा आणि तिचा प्रियकर विक्रांत या दोघांनाही अटक केली. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी 'हत्येचा प्रयत्न' केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला होता. मात्र, आता उपचारांदरम्यान राजीवचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी या कलमांमध्ये बदल केला असून, आता या प्रकरणाचे रुपांतर 'हत्येच्या' गुन्ह्यात करण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे.









