मातीत गाडला गेला मजूर, दहा दिवसांनी बाहेर आला पाय; 'त्या' रात्री काय घडलं?
एका बांधकाम सुरु असलेल्या रस्त्यावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ता बांधकामांतर्गत दुभाजकावरील माती सपाट करण्याचे काम सुरू असताना, लोकांना मातीच्या ढिगाऱ्याबाहेर आलेला एक पाय दिसला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मातीत गाडला गेला मजूर
दहा दिवसांनी बाहेर आला पाय
'त्या' रात्री काय घडलं?
Crime News : एका बांधकाम सुरु असलेल्या रस्त्यावर एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुरुवारी (4 जून) सकाळी रस्ता बांधकामांतर्गत दुभाजकावरील माती सपाट करण्याचे काम सुरू असताना, लोकांना मातीच्या ढिगाऱ्याबाहेर आलेला एक पाय दिसला. सुरुवातीला तो एखादा कपडा असावा असा अंदाज नागरिकांनी वर्तवला, मात्र जवळ जाऊन पाहिल्यावर हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आले. यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने माती हटवून मृतदेह बाहेर काढला. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ही घटना आहे.
मजुराचा मातीत गुदमरुन मृत्यू
मृतदेहाजवळ पोलिसांना एक पिशवी सापडली असून, त्यात काही भाकरी, भाजी, देशी दारूचा पाऊच, चिलम, मोबाईल चार्जर आणि एक शाल होती. या साहित्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, हा मजूर रात्री तिथेच थांबला होता आणि दुभाजकावर शाल अंथरून झोपला होता. हा अपघात भटहट शहराजवळ घडला असून, रात्रीच्या वेळी माती घेऊन आलेल्या डंपर चालकांना दुभाजकावर कोणीतरी झोपले आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. डंपरमधून थेट मजुराच्या अंगावरच माती टाकली गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे; मात्र पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : खून अलिबागमध्ये अन् बॉडी आंबेनळी घाटात, आजीला संपवणाऱ्या नातवाने काय सांगितलं?
10 दिवसांपासून बेपत्ता
मृतदेह सापडल्यानंतर काही वेळातच एक महिला आपल्या दोन मुलांसह घटनास्थळी पोहोचली. तिने मृतदेहाची ओळख पटवली असून, मृत व्यक्ती तिचे पती मिंटू असल्याचे सांगितले. मिंटूची ओळख पटताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. मृत मजूर मिंटू हा गेल्या पाच वर्षांपासून गुलरिहा येथील तरकुलहा भागात आपल्या सासरच्या घरी पत्नी नीता देवी आणि मुलांसह राहत होता. तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, मिंटू सुमारे 10 दिवसांपूर्वी जंगल कौडिया परिसरात रस्ता बांधकामाच्या कामासाठी गेला होता, त्यानंतर तो घरी परतलाच नव्हता.
हे ही वाचा : Monsoon Update: 10 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसणार.. मान्सूनची दमदार हजेरी, थोड्याच वेळात कोसळधार!
पोलिसांनी काय सांगितलं?
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मजुराचा मृत्यू मातीखाली दबल्यामुळेच झाला की त्यामागे इतर काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. गुलरिहा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जगदीश पाल यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, या वेदनादायक घटनेने बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था आणि देखरेखीच्या त्रुटींवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, स्थानिक नागरिकांकडून या अपघाताला मोठी निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.









