Deoria : पती-पत्नी, दोन मुली आणि मुलाचा चिरला गळा, झाडल्या गोळ्या; कारण…
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून दोन कुटुंबात जमिनीचा वाद सुरु होता. त्यावरुन आज सकाळी हत्याकांड घडून आले आहे. घरात घुसून दिसेल त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन ठार करण्यात आले आहे. त्यामुळे सगळं राज्य हादरून गेले आहे.
ADVERTISEMENT
Uttar Pradesh Murder: गावात पहाटे पहाटे बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या, घरात दिसतील त्याच्यावर तलावारीचे सपासप वार आणि नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले 5 जणांचे मृतदेह. हे असे भयानक हत्याकांड (Murder) उत्तर प्रदेशातील देवरिया (deoria,uttar Pradesh) जिल्ह्यात घडले आणि सगळे उत्तर प्रदेश हादरले. ही घटना पोलिसांना समजली त्यावेळी पोलिसांनाही मोठा धक्का बसला. ही घटना जिल्हा पोलीस अधीक्षकांना समजताच पोलीस फौजफाट्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
ADVERTISEMENT
जमिनीचा वाद टोकाला
रुद्रपूरमधील फतेहपूरमध्ये एका जमिनीच्या हद्दीवरून जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य प्रेम यादव आणि सत्य प्रकाश दुबे यांच्यामध्ये वाद सुरु होता. जमिनीच्या हद्दीचा प्रश्न असल्याने वांरवार त्यांच्यामध्ये वाद होत होते. त्यामुळे सत्य प्रकाशने आरोप केला होता की, प्रेम यादवकडून आमच्या जमिनीवर वारंवार कब्जा केला जातो आहे. तर प्रेम यादवही ती आमचीच जमिन असल्याचे सांगत होता. त्यावरूनच या दोन कुटुंबीयांमध्ये वाद सुरु होता.
वाद जुनाच
जमिनीचा वाद गेल्या काही वर्षापासून सुरु असला तरी सोमवारी मात्र एक धक्कादायक घटना घडली. पहाटे पहाटे प्रेम यादव यांचा रस्त्यात मृतदेह पडल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. प्रेम यादव यांचा गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. ही हत्या कुणी केली याचा अजून तपास लागायचा आहे. मात्र प्रेम यादव यांच्या कुटुंबीयांचा संशय सत्य प्रकाश दुबे यांच्यावर होता. त्यामुळे प्रेम यादव यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी यादवांच्या कुटुंबीयांनी बदला घेण्यासाठी दुबे यांच्या घरावर हल्ला चढविला.
हे वाचलं का?
तीक्ष्ण हत्यारांचे वार
हातात लाट्याकाट्या, बंदूक आणि हत्यारं घेऊन पहाटे पहाटे दुबे यांच्यावर हल्ला चढविल्याने घरातील सर्वच सदस्य घरात होते. त्यामुळे यादवांच्या कुटुंबीयांनी घरात दिसतील त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले.
दिसेल त्याला संपवलं
पोलिसांनी सांगितले की, प्रेम यादव यांच्या हत्येमुळे त्यांचे कुटुंबीय दुःखात होते. त्याचवेळी पहाटे त्यांनी दुबे यांच्या घरावर जोरदार हल्ला केला. प्रेम यादवांच्या घरातील सदस्यांनी दुबे यांच्या घरात घुसताच दिसेल त्या व्यक्तिची त्यांनी हत्या केली. या हल्ल्यात कुणाचा गळा चिरला तर कुणाला गोळी घातली. त्यामुळे पहिल्या हल्ल्यातच एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
फौजेफाट्यासह पोलीस दाखल
प्रेम यादव यांच्या कुटुंबीयांनी सत्य प्रकाश यांची पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एका मुलावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये दुबे यांचा मुलगा गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. एकाच गावात 6 जणांची हत्या झाल्याचे पोलिसांना समजताच त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना देवरियामध्ये हत्याकांड झाल्याचे समजताच त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT