Vasai Crime : लोखंडी पानाने डोक्याचा चेंदामेंदा, भररस्त्यात प्रेयसीची निर्घृण हत्या; वसई हादरली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

vasai crime news boy friend killed her girl friend full public view
प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.
social share
google news

Vasai Crime News : झाकीर मिस्त्री  वसईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लोखंडी पानाने डोक्यावर आणि छातीवर हल्ला करून एका माथेफिरू प्रियकराने (Boy Friend) प्रेयसीची (Girl Friend) निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. आरती यादव असे या 20 वर्षीय मृत तरूणीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे भररस्त्यात ही हत्येची घटना घडली आहे. आणि आरोपी तरूणीची हत्या करत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका बजावली आहे. या घटनेने सध्या वसई (Vasai News) हादरली आहे. (vasai crime news boy friend killed her girl friend full public view) 

वसई पुर्वेच्या चिंचपाडा परिसरात ही घटना घडली आहे. आज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरीकांची रस्त्यावर वर्दळ असताना प्रियकराने लोखंडी पाना काढून प्रेयसीच्या डोक्यावर अनेकदा हल्ला केला. या हल्ल्यानंतर पीडीत तरूणी रस्त्यावर पडली होती. त्यानंतर तरूणाने तिच्या छातीवर देखील लोखंडी पानाने हल्ला केला. या हल्ल्यानंतर तरूणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हे ही वाचा : Rahul Gandhi : 5 कारणे ज्यामुळे राहुल गांधींनी वायनाडऐवजी रायबरेली निवडली

पंजाबी ड्रेस घातलेली तरूणी रस्त्यावर पडून होती. तर आरोपी तरूण हा हातात लोखंडी पाना घेऊन तिच्या मृतदेहाशेजारी उभा आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपी तरूण 'माझ्यासोबत असं का केलंस' असे ओरडताना दिसला आहे. आरोपी तरूणीची हत्या करत असताना रस्त्यावर अनेकजण उपस्थित होते. मात्र कोणत्याही व्यक्तीने तरूणीच्या बचावाचे धाडस केले नाही. याउलट अनेकजण व्हिडिओ काढण्यात मग्न होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या हल्ल्यानंतर आरती यादव ही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला नव्हता. त्यामुळे त्याला लगेच ताब्यात घेता आले आहे. रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सध्या वालीव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : MVA : काँग्रेसचं वादाच्या मुद्द्यावर 'बोट', उद्धव ठाकरे धडा घेणार का?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT