Rahul Gandhi : 5 कारणे ज्यामुळे राहुल गांधींनी वायनाडऐवजी रायबरेली निवडली

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधी रायबरेलीचेच खासदार राहणार

point

प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार निवडणूक

Rahul Gandhi Raebareli : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात एक होता वायनाड आणि दुसरा रायबरेली. दोन्ही मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यामुळे कोणत्या मतदारसंघाची खासदारकी ठेवणार, याबद्दल उत्सुकता होती, ती संपली. राहुल गांधींनी वायनाडची खासदारकी सोडली. तिथे आता पोटनिवडणूक होणार असून, काँग्रेसकडून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार आहेत. पण, राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेलीची निवड का केली? काँग्रेसचे राजकारण काय, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. (why did Rahul Gandhi retains Rae Bareli Lok Sabha seat)

ADVERTISEMENT

2019 मध्ये गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले, तेव्हा वायनाडने त्यांना खासदार म्हणून निवडून दिले होते. कठीण काळात साथ देणाऱ्या वायनाड मतदारसंघ सोडून राहुल गांधींनी रायबरेली का निवडले? 

खरंतर या निर्णयामागे काँग्रेसची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी उत्साहित होऊन काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवाई यांनी आज तकला सांगितले की, 'काँग्रेसचा हा निर्णय एक मजबूत आणि विचारपूर्वक दिलेला राजकीय संदेश आहे'

हे वाचलं का?

हेही वाचा >> काँग्रेसचं वादाच्या मुद्द्यावर 'बोट', उद्धव ठाकरे धडा घेणार का?

किडवाई यांच्या मते, '२०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेसला लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. नरेंद्र मोदी 2014 आणि 2019 च्या तुलनेत राजकीयदृष्ट्या कमकुवत स्थितीत आहेत, कारण यावेळी केंद्रात एनडीएचे सरकार आहे आणि भाजपला पूर्ण बहुमत नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही संसदेत ठेवून विरोधातील नेतृत्वाला धार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.'

आता केरळमधील वायनाडऐवजी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याला राहुल गांधींनी प्राधान्य का दिले, याची 5 कारणे समजून घ्या...

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस उभी करण्याचा प्रयत्न

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशात सहा जागा जिंकल्या. 2019 मध्ये त्यांनी फक्त रायबरेलीची जागा जिंकली होती. उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीने 43 जागा जिंकल्या, त्यापैकी समाजवादी पक्षाने 37 जागा जिंकल्या. 2019 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 पैकी 62 जागा जिंकणाऱ्या एनडीएसाठी हा मोठा धक्का होता. 2024 च्या निवडणुकीत एनडीएला केवळ 36 जागा जिंकता आल्या, तर भाजपला 33 जागा मिळाल्या. मतांच्या प्रमाणात, मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाचा (बीएसपी) सर्वात मोठा पराभव झाला. त्यांची मतांची टक्केवारी 19% वरून 9% पर्यंत घसरली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ईव्हीएम खरंच हॅक केलं जाऊ शकतं? तज्ज्ञ म्हणतात...

ही मते प्रामुख्याने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडे गेली. जर सपाला बसपाच्या मतांपैकी 6-7%, तर काँग्रेसला 2-3% मिळाले. उत्तर प्रदेशात दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण मतदारांना पुन्हा काँग्रेसकडे आणण्याचे प्रयत्न केले जातील. त्यामुळे राहुल गांधींनी वायनाडऐवजी रायबरेलीची जागा निवडण्याचे हे पहिले कारण असल्याचे दिसते.

रणनीती बदल आणि आक्रमक भूमिका

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसने आपली भूमिका बदलली आहे. राहुल गांधींनी रायबरेली खासदारकी ठेवणे आणि वायनाडची जागा सोडणे हे त्या आक्रमक दृष्टिकोनाचे द्योतक आहे. 

रशीद किदवई यांच्या मते, 'काँग्रेसने आपली रणनीती बदलली आहे. आता काँग्रेसने बचावात्मकतेतून आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. वायनाडकडे बचावात्मक दृष्टिकोन होता. कारण 2019 मध्ये अमेठीतून होणारा संभाव्य पराभव पाहता राहुल गांधी तिथे पोहोचले होते. उत्तर प्रदेशातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहून राहुल गांधी यांनी वायनाडऐवजी रायबरेलीची निवड केली आहे.

हेही वाचा >> रिव्हर्स गिअर, दरीत कार... Reel च्या नादात तरूणी जागीच ठार! Viral Video

वायनाडचे खासदार म्हणून राहुल गांधी दक्षिणेची आणि प्रियांका गांधी उत्तरेची कमान सांभाळत होत्या. ही काँग्रेसची जुनी रणनीती होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घेत काँग्रेसने आपली रणनीती बदलली आहे. 

किडवई म्हणतात, 'महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील चांगल्या कामगिरीमुळे काँग्रेसला आशा निर्माण झाली आहे आणि परिणामी त्यांच्या रणनीतीत बदल झाला आहे. तो यशस्वी होईल की नाही, हे येणारा काळच सांगेल. भाजपला आव्हान द्यायचे असेल, तर दक्षिणेतून नव्हे तर भाजप मजबूत असेल तेथेच लढा द्यावा लागेल. हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भाजपची ताकद खूपच मजबूत आहे. भाजप दक्षिणेत अजूनही जमीन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आजपर्यंत त्यात फारसे यश आलेले नाही.'

देशात काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी उत्तर प्रदेश आवश्यक

केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हा प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या मताधिक्य खाऊ लागले, तेव्हा काँग्रेसची घसरण प्रथम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून आली. केंद्रीय सत्तेवरील त्यांची पकडही ढिली होऊ लागली. 

काँग्रेसला केंद्रात स्वबळावर सत्तेवर यायचे असेल, तर त्यांना उत्तर प्रदेशात पुनरुज्जीवन करावे लागेल. समाजवादी पक्षासोबत राहून हा विजय मिळाला असला तरी उत्तर प्रदेशात सहा जागा जिंकणे काँग्रेससाठी चांगले लक्षण आहे. 

काँग्रेससाठी आणखी एक चांगले गोष्ट म्हणजे जाट नेते जयंत चौधरी आणि त्यांचा राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) एनडीएमध्ये असूनही, उत्तर प्रदेश आणि हरयाणातील जाट मतदारांचा काँग्रेसकडे कल आहे.

मने जिंकण्यासाठी काँग्रेसला हार्टलँड जिंकावा लागतो

मने जिंकण्यासाठी काँग्रेसला हार्टलँड म्हणजे उत्तर प्रदेश आणि इतर शेजारील हिंदी भाषिक राज्यात जिंकावं लागेल. या ठिकाणी भाजपला एकट्याने आणि प्रादेशिक मित्रपक्षांसोबत युती करून मुकाबला करावा लागणार आहे. 

हार्टलँडच्या नऊ प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसला आपली कामगिरी सुधारावी लागेल, कारण लोकसभेतील 543 पैकी 218 खासदार या नऊ राज्यांमधून येतात. यावेळी उत्तर प्रदेश व्यतिरिक्त हरयाणा आणि राजस्थानमध्येही काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. 

रशीद किडवई म्हणतात, 'काँग्रेस हिंदी पट्ट्यातील आपल्या शक्यतांचा शोध घेत आहे आणि त्यामुळेच उत्तर प्रदेशमधून राहुल गांधींचा प्रचार केला जात आहे'. उत्तर प्रदेशमध्ये अधिक जागा जिंकून, काँग्रेस बिहारमध्ये देखील प्रभाव पाडू शकते, जिथे ते राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोबत आघाडीत आहेत.'

प्रियांका गांधी वायनाडला गेल्याने काय होईल?

केरळमध्ये 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून येथे काँग्रेसची सत्ता येऊ शकते. केरळमधील लोक सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला निवडत आहेत. 

राज्यातील जनतेने 2021 मध्ये एलडीएफला सत्तेत परत आणून बहुतेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सीपीआय (एम) ने खराब कामगिरी केली आणि फक्त एक जागा जिंकली. 2024 मध्ये लोकसभेच्या 20 पैकी 14 जागा काँग्रेसने जिंकल्या, तर त्यांचा मित्रपक्ष IUML ने दोन जागा जिंकल्या.

2026 मध्ये केरळ जिंकेल, असा विश्वास काँग्रेसला आहे. प्रियांका गांधी या भाऊ राहुलच्या जागी वायनाडमधून निवडून आल्यास राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचारालाही वेग येईल. रशीद किडवई प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याबद्दल सांगतात, 'केरळमध्ये, जिथे 2026 मध्ये निवडणुका होणार आहेत, अशा वेळी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी असणे पक्षाला मदत करणारे ठरू शकते'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT