सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं आणि या गुटखा किंगचं काय आहे कनेक्शन?
Satish Kaushik Death : अभिनेता आणि दिग्दर्शक (Actor and Director) सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर (Rajasthan) राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सरदारशहर येथील उद्योगपती कुबेर गुटखा ग्रुपचा मालक विकास मालू (Vikas Malu) चर्चेत आहे. विकास सरदारशहरमध्ये होळीनिमित्त रंगारंग कार्यक्रम आयोजित करत होता. गेल्या काही वर्षांपासून सतीश कौशिक (Satish kaushik holi) होळीच्या दिवशी येथे येत असत. (what is connection […]
ADVERTISEMENT
Satish Kaushik Death : अभिनेता आणि दिग्दर्शक (Actor and Director) सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर (Rajasthan) राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सरदारशहर येथील उद्योगपती कुबेर गुटखा ग्रुपचा मालक विकास मालू (Vikas Malu) चर्चेत आहे. विकास सरदारशहरमध्ये होळीनिमित्त रंगारंग कार्यक्रम आयोजित करत होता. गेल्या काही वर्षांपासून सतीश कौशिक (Satish kaushik holi) होळीच्या दिवशी येथे येत असत. (what is connection of gutka king vikas malu with satish kaushik death Mistry? )
ADVERTISEMENT
होळी साजरी करण्यासाठी सतीश 2019 पासून सातत्याने सरदारशहर येथे जात होते, असं कळतंय. यावेळी विकास मालू सरदारशहरमध्येच होळी खेळला पण रात्री उशिरा दिल्लीतील त्याच्या फार्महाऊसवर गेला. काही निवडक लोकांसोबत होळी पार्टी झाली. सतीश कौशिकही यावेळी उपस्थित होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्याच रात्री त्यांचे निधन झाले.
गुरुग्रामला नेत असताना वाटेतच सतीश कौशिकचा मृत्यू झाला
असे सांगितले जात आहे की होळीच्या रात्री उशिरा पार्टी केल्यानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांना छातीत दुखू लागले आणि फार्महाऊस ते गुरुग्रामला जात असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या फार्महाऊसमध्ये पार्टी झाली ते कुबेर गुटखा कंपनीचे मालक विकास मालू यांचे आहे.
हे वाचलं का?
विकास मालू हा एका बलात्कार प्रकरणात फरार आहे. अटक टाळण्यासाठी तो अनेकदा दुबईत राहतो. विकास यापूर्वी त्याच्या सरदारशहर गावात होळीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पार्टीसाठी दिल्लीला गेला होता. निवडक लोकांमध्ये एक बिल्डर देखील होता, ज्याचा वसंत कुंज, द्वारका आणि जनकपुरी इत्यादी भागात प्रॉपर्टीचा व्यवसाय आहे. तो एका विशेष पोलिस आयुक्ताचा अतिशय खास मानला जातो.
अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू कशामुळे झाला?
ADVERTISEMENT
प्रकरण मिटवण्याची जबाबदारी मालूने बिल्डरवर सोपवली
सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी समजताच विकास मालू दुबईला रवाना झाला. हे प्रकरण मिटवण्याची जबाबदारी मालूने बिल्डरवर सोपवल्याचे सांगण्यात येत आहे. बिल्डरने रात्री विशेष आयुक्तांना बोलावून संपूर्ण घटनेची माहिती दिली.
ADVERTISEMENT
यानंतर विशेष आयुक्तांनी हे प्रकरण हाताळण्याची जबाबदारी जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यावर सोपवली. अधिकारी आणि बिल्डर रात्रभर बोलत राहिले. या प्रकरणात फार्महाऊस आणि त्याच्या मालकाचे नाव कुठेही येऊ नये, यासाठी पैशांच्या व्यवहाराचे प्रकरणही समोर येत आहे.
Satish Kaushik Death: सतीश कौशिकांसोबत शेवटच्या क्षणी काय-काय झालं?
विकास मालूच्या अडचणी वाढताना दिसत आहेत
पोलिसांनी शवविच्छेदन करून सतीश कौशिक यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आता विकास मालूच्या पत्नीने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून हत्येचे कारण 15 कोटींचा व्यवहार असल्याचे सांगितल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. त्यासोबतच विकासाच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत.
“माझ्या पतीनेच अभिनेते सतीश कौशिक यांची हत्या केली”, महिलेनं सांगितलं कारण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT