Atiq Ahamad : सनी, लवलेश आणि अरुण; तिघांनी अतिक-अशरफची का केली हत्या?
Atiq Ahmed, brother Ashraf shot dead updates : अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांना पोलीस शनिवारी (15 एप्रिल) रात्री वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. त्याचवेळी आलेल्या तीन तरुणांनी गोळ्या झाडल्या… तिन्ही तरुण वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत.
ADVERTISEMENT
गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला आणि माजी खासदार राहिलेल्या गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अजीम ऊर्फ अशरफ अहमदची शनिवारी (15 एप्रिल) रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रयागराजमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाने उत्तर प्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 म्हणजे जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेले तिन्ही आरोपी हे प्रयागराजमधील नसल्याची माहिती आता समोर आली आहे.
आरोपींना व्हायचंय मोठा माफिया?
अतिक अहमद आणि अशरफ अहमदची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे. तिन्ही आरोपींवर कुठे कुठे आणि कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. सुरूवातीच्या चौकशीत आरोपींनी सांगितलं की, त्यांना मोठा माफिया व्हायचं आहे आणि त्यामुळेच त्यांनी दोघांच्या हत्या केल्या.
हे वाचलं का?
हेही वाचा >> पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अतिक-अशरफची गोळ्या झाडून हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद
आरोपींनी सांगितलं की, “कधीपर्यंत छोटे मोठे शूटर राहायचं? मोठा माफिया व्हायचं आहे, त्यामुळेच हे हत्याकांड घडवून आणलं.” आरोपींनी अशा स्वरूपाचं उत्तर दिलं असलं, तरी पोलिसांकडून वेगवेगळ्या अंगाने तपास सुरू करण्यात आला आहे. कारण तिन्ही आरोपींच्या विधानांमध्ये विरोधाभास असल्याचं पोलीस चौकशीतून दिसून आलं.
तिन्ही आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीतून अशी माहिती समोर आली आहे की, अतिक आणि अशरफची हत्या करणारा लवलेश तिवारी बांदाचा रहिवाशी आहे. अरुण मौर्य हमीरपूरचा रहिवाशी असून, तिसरा आरोपी सनी कासगंज जनपद येथील आहे.
ADVERTISEMENT
पोलीस चौकशीत आरोपींनी त्यांचा हाच पत्ता सांगितला असून, पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपी अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची हत्या करण्यासाठीच प्रयागराज आले होते.
ADVERTISEMENT
बोगस नंबरची मोटारसायकल
पोलीस अधिकारी धुमलगंज राजेश मौर्य यांची टीम अतिक अहमद आणि अशरफ अहमदला घेऊन आली होती. अतिक अहमद आणि अशरफ अहमदची हत्या करण्यासाठी आरोपी ज्या बाईकवरून (UP70 M7337) आले होते, ती बाईक वाहन अॅपवर सरदार अब्दुल मन्नान खानच्या नावे आहे. आरोपींच्या बाईकचा नंबर हिरो होंडाच्या जुन्या गाडीचा आहे. ती गाडी 3 जुलै 1998 मध्ये खरेदी केली गेली होती.
हेही वाचा >> ‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लिम…’ अतिकचे शेवटचे शब्द अन् थेट डोक्यात गोळी
त्यामुळे आरोपींच्या बाईकवर असलेला नंबर बनावट आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जाणार आहे. आरोपींनी गाडी कुठून आणली? आणि ती कुणाची आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. आरोपी पत्रकार बनून अतिक आणि अशरफच्या जवळ गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडील कॅमेऱ्याबद्दलही चौकशी केली जाणार आहे.
गोळ्या घातल्या अन् म्हणाले, सरेंडर सरेंडर
अंदाधूंद गोळीबार आरोपींनी अतिक अहमद आणि अशरफ अहमदची हत्या केली. त्यानंतर लगेच स्वतः पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडे बंदूकीची काडतुसं, एक कॅमेरा, एक माईक आयडीही सापडली. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात आलं असून, संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT