Sukhdev Singh Gogamedi Murder: …त्यालाही घातल्या गोळ्या, शेवटच्या 10 मिनिटांत काय घडलं?

भागवत हिरेकर

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये घरात घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गँगस्टर रोहित गोदाराशी संबंधित काही अज्ञात आरोपींनी गोगामेडींच्या घरातच हत्याकांड घडवलं. अखेरच्या दहा मिनिटांत काय घडलं?

ADVERTISEMENT

Know the story of the last 10 minutes of the murder of Sukhdev Singh Gogamedi
Know the story of the last 10 minutes of the murder of Sukhdev Singh Gogamedi
social share
google news

Sukhdev Singh Gogamedi News Today : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी जयपूरमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गँगस्टर रोहित गोदाराशी संबंधित काही अज्ञात आरोपींनी गोगामेडींच्या घरातच हे घडवलं. आरोपी आधी सुखदेव यांच्याशी बोलत राहिले आणि नंतर अचानक दोघांनी गोळीबार केला. ही संपूर्ण घटना अवघ्या 10 मिनिटांत घडली. अखेरच्या दहा मिनिटांत काय घडलं, हे आता समोर आले आहे.

जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (5 डिसेंबर) दिवसाढवळ्या दोन बदमाशांनी गोगामेडींवर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या गोळीबारात तेथे उपस्थित असलेले गोगामेडींचे गार्ड अजित सिंह हेही गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगामेडी यांच्या घरी हल्लेखोरांना घेऊन गेलेल्या तरुणाचाही गोळीबारात मृत्यू झाला. नवीन शेखावत असे त्याचे नाव आहे. हत्येची जबाबदारी घेत गँगस्टर रोहित गोदाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

आधी चर्चा, मग झाडला गोळ्या

आधी तीन लोक सुखदेव यांच्या घरी पोहोचले. मग ते सोफ्यावर बसले आणि गोगामेडींशी बोलू लागले. सुमारे 10 मिनिटांनंतर दोन हल्लेखोर उठले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबार सुरू असताना गोगामेडींच्या गार्डने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला. तेथून निघाले असताना एका गुंडाने गोगामेडी यांच्या डोक्यात गोळी झाडली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात नवीन नावाच्या व्यक्तीलाही गोळी लागली.

हे वाचलं का?

    follow whatsapp