Pune Acp गायकवाडांचं रक्त का खवळलं, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येची Inside Story

मुंबई तक

सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी त्यांच्या पुण्याच्या राहत्या घरी स्वत:च्या पत्नीची आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. वाचा याची इनसाइड स्टोरी.

ADVERTISEMENT

Assistant Commissioner of Police Bharat Gaikwad shot dead his wife and nephew at his Pune residence. Read the inside story
Assistant Commissioner of Police Bharat Gaikwad shot dead his wife and nephew at his Pune residence. Read the inside story
social share
google news

Pune Acp Bharat Gaikwad: पुणे: महाराष्ट्र पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड (Bharat Gaikwad) यांनी त्यांच्या पुण्याच्या (Pune) राहत्या घरी स्वत:च्या पत्नीची (Wife) आणि पुतण्याची (nephew) रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून हत्या (murder) केली. त्यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. या सगळ्या प्रकाराला चार दिवस झालेले असतानाही या घटनेमागचं रहस्य कायम आहे. (why did pune acp bharat gaikwad murder of wife and his nephew know inside story crime news)

या दुहेरी हत्या आणि आत्महत्येच्या प्रकरणात स्वत: भरत गायकवाड हे आरोपी आहेत. पण आता तेच ह्यात नसल्याने या पूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी, खरं कारण शोधणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

Pune Bharat Gaikwad: हत्या, आत्महत्येची Inside Story

पुणे पोलीस आणि अमरावती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ACP भरत गायकवाड हे 57 वर्षांचे, मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. तिथेच त्यांचं शिक्षण झालं. पुढे MPSC परीक्षा पास करून 1988-89 साली ते महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. त्यांचं पहिलं पोस्टिंग हे मुंबईत PSI म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून झालं.

पुढील अनेक वर्ष ते मुंबई पोलीस दलात ते कार्यरत होते. स्वत:च्या कर्तृत्वावर मुंबईतील डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp