Abhishek Ghosalkar ची मॉरिसने केली हत्या; फडणवीसांनी सांगितलं कारण

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली.
devendra fadnavis first reaction after mauris noronha shot dead to abhishek ghosalkar
social share
google news

Devendra fadnavis on Abhishek Ghosalkar Shot dead : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा याने त्यांची हत्या केली. मॉरिसने अभिषेक यांची हत्या का केली याची चर्चा सुरूये. यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना महत्त्वाची माहिती दिली. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, "काल घडलेली अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातील घटना ही अत्यंत दुःखद आहे. एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीने त्या ठिकाणी निधन व्हावं, हे अतिशय गंभीर आहे. एकूणच या प्रकरणाला काही लोकं राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करताहेत, ते देखील योग्य नाही", अशी विनंती त्यांनी केली.  

अभिषेक घोसाळकर-मॉरिस नरोन्हा सोबत करायचे काम -फडणवीस

पुढे फडणवीस म्हणाले, "ही घटना जरी गंभीर असली, तरीदेखील अगदी २०२४ मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या, ते मॉरिश असतील किंवा अभिषेक घोसाळकर असतील, यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. वर्षानुवर्षे ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत", असे सांगत फडणवीसांनी दोघेही सोबत काम करत होते, असे अधोरेखित केले.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"कुठल्या विषयातून त्यांच्यात बेबनाव झाला की,या मॉरिशने घोसाळकरांना गोळ्या मारल्या आणि स्वतःवरही गोळ्या मारून घेतल्या, हा निश्चितपणे एक महत्त्वाचा विषय आहे. त्याची चौकशी सुरू आहे", अशी माहितीही फडणवीसांनी दिली. 

अभिषेक घोसाळकरांची का करण्यात आली हत्या?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहे. त्या योग्यवेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील. त्याची जी कारणे लक्षात येताहेत, ती वेगवेगळी आहेत. ती निश्चित झाली की, ती देखील सगळ्यांना देण्यात येईल", असे फडणवीस यांनी सांगितले.  

ADVERTISEMENT

"माझी अपेक्षा एवढीच आहे की, घटना गंभीर आहे. अशा घटनेचं राजकारण करणं योग्य नाही. या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे वगैरे अशी विधाने करणे हे चुकीचे आहे. कारण वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली ही घटना आहे. तथापि यासंदर्भात बंदुका, लायसेन्स होते की नाही. बंदूक कुठून आली किंवा लायसेन्स देताना खबरदारी घेतली पाहिजे का? याचा विचार सरकार करेल", असे फडणवीस यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT