‘दारू पिऊ नका..’ म्हणताच BJP नेत्याकडून बायकोची हत्या, बंदूक उचलली अन्..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Enraged by his wife's request not to consume alcohol, the BJP leader shot her dead with a gun. This incident took place in Bhopal, Madhya Pradesh
Enraged by his wife's request not to consume alcohol, the BJP leader shot her dead with a gun. This incident took place in Bhopal, Madhya Pradesh
social share
google news

Crime: भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये (Bhopal) भाजप नेत्याने (BJP leader) पत्नीची गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. त्याच्या पत्नीने त्याला दारू पिण्यास मनाई केली या क्षुल्लक कारणावरुन भाजप नेत्याने आपल्या पत्नीला एका झटक्यात संपवल्याचं आता समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. (wife alcohol bjp leader shot dead gun firing bhopal madhya pradesh crime news)

ADVERTISEMENT

वास्तविक, राजेंद्र पांडे भोपाळच्या रातीबड पोलीस स्टेशन हद्दीतील साईनाथ कॉलनीत आपल्या कुटुंबासह राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, तो भाजपशी संबंधित असून तो टीटी नगर मंडळ भागातील माजी उपाध्यक्षही होता. त्याच वेळी त्यांची पत्नी शीला ही देखील भारतीय जनता महिला मोर्चाची सक्रिय सदस्य होती. पण याच राजेंद्र पांडेला दारूचे प्रचंड व्यसन होतं.

हे ही वाचा >> भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझादवर जीवघेणा हल्ला, गोळीबारात गंभीर जखमी

रातीबड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कर्मवीर सिंग यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपी प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. त्यांना दोन मुली असून त्याचे लग्न झाले आहे. तसेच त्याची मुलगी ही गरोदर आहे. त्यामुळे ती तिच्या पतीला सोबत घेऊनच माहेरी आली होती. दरम्यान, राजेंद्र पांडेला दारू पिण्याची सवय होती, त्यामुळे त्याचे पत्नीसोबत वारंवार वाद होत होते.

हे वाचलं का?

दारू पिऊ नका सांगताच पांडेने पत्नीवर केला गोळीबार

पोलिसांनी पुढे सांगितले की, मंगळवारी रात्री त्याने कुटुंबीयांच्या उपस्थितीत घरातच दारू पिण्यास सुरुवात केली. यावरून त्याचा पत्नीशी वाद सुरू झाला. मुलगी व जावयाने हे प्रकरण शांत केले. यावेळी राजेंद्र रागाच्या भरात घराबाहेर पडला. सुमारे तासाभरानंतर तो घरी परतला. ज्यानंतर पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या राजेंद्रने आपली परवाना असलेली बंदूक उचलली आणि पत्नी शीला हिच्यावर गोळीबार केला. गोळी शीलाच्या कमरेला लागली आणि तिच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. पत्नीवर गोळी झाडल्यानंतर आरोपी भाजप नेता राजेंद्र पांडे हा घटनास्थळावरून पळून गेला.

हे ही वाचा >> Pune Crime: ‘आज एक तरी मर्डर करतोच..’, पुणे कोयता हल्ल्याची Inside Story

उपचारादरम्यान मृत्यू, पोलीस आरोपीच्या शोधात

कुटुंबीयांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली आणि रुग्णवाहिकाही बोलावली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी शीला हिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. पण येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर शीला हिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याविरुद्ध पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सध्या ते त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप तरी त्यांच्या हाती लागलेला नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT