पत्नीने पतीला चोपलं, घरात कोंडलं… महिलेने का केला एवढा राडा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

wife demanded divorce from husband refused father and brother beat him up
wife demanded divorce from husband refused father and brother beat him up
social share
google news

UP Crime: उत्तर प्रदेशामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. बांदा येथे एका पत्नीने आपला पती घटस्फोट (Divorce) का देत नाही म्हणत त्याला बेदम मारहाण (Beaten) केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पोलिसात गेले आहे, या प्रकरणी सासरच्या लोकांवर गंभीर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेने आपल्या पतीकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र पतीकडून दिला गेलेला नकार पतीला महागात पडला आहे. घटस्फोटाला पतीकडून नकार दिला जात आहे, त्याचा राग मनात धरुन पत्नीने तिचा भाऊ आणि वहिनीला सोबत घेऊन त्याला जबर मारहाण केली आहे. त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.

ADVERTISEMENT

घरात घुसून मारहाण

या मारहाणीनंतर त्यांनी नवऱ्याला घरात कोंडून त्या सर्वांनी पळ काढला आहे. त्यांनी घरात पतीला डांबून ठेवल्यामुळे त्याला बाहेर पडता आला नव्हते. त्यामुळे तो कसातरी घरातून बाहेर आला होता. मारहाण करुन डांबून ठेवल्यामुळे त्याने आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी तक्रारीनुसार पत्नीसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरात घुसून मारहाण करणे, दंगा करणे आणि धमकावण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर कलमातंर्गत पत्नीविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> फ्लॅटचा दरवाजा उघडला अन्… रक्ताच्या थारोळ्यात बाप-लेकीचा मृतदेह, मुलगा फरार

दोघांची बाचाबाची

या प्रकरणाची माहिती देताना पीडित पती प्रदीप सिंह यांनी सांगितले की, त्या दोघांचे लग्न 2021 मध्ये झांशी येथे झाले होते. लग्नानंतर पत्नी सासरी आली, मात्र फक्त 11 दिवस थांबून ती पुन्हा माहेरी निघून गेली. जाताना तिने लग्नात घातलेले दागिनेही ती घेऊन गेली होती. त्यावेळी त्या दोघांची बाचाबाचीही झाली होती. त्यानंतर पती प्रदीप सिंह हा तिला बोलवायला अनेकवेळा माहेरी गेला होता. मात्र तरीही ती आली नव्हती. काही दिवसांपूर्वी प्रदीप यांची पत्नी आपल्या वडिलांना आणि भावाला घेऊन सासरी आली होती. त्यावेळी तिने सांगितले की, मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही. तू माझं साहित्य आणि माझे दागिने परत दे व मला तू घटस्फोट दे असं स्पष्टपणे त्याला तिने सांगितले होते.

हे वाचलं का?

फक्त लेखी घटस्फोट

त्यानंतर त्याने सांगितले की, माझ्या पत्नीला घटस्फोट देणे माझ्यासाठी कठीण होते.त्यामुळे त्याने तिला तू न्यायालयात जा, तिथेच मी तुला घटस्फोट देईन असंही स्पष्टपणे त्याने सांगितले होते. मात्र पत्नीने न्यायालयात जाणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याच्या बायकोने आपल्याकडून लेखी स्वरूपात घटस्फोट घ्या असंही तिने त्याला सांगितले होते. मात्र त्याला प्रदीपने नकार दिला होता. त्याचा राग आल्याने पत्नी, तिच्या वडिलांनी आणि भावाने प्रदीपला मारहाण केली होती

सासरच्या मंडळींवर गुन्हा

प्रदीपला सासरच्या मंडळीकडून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला घरात कोंडून त्या सर्वांनी पळ काढला होता. त्यानंतर प्रदीपने घरातून बाहेर येत त्या सर्वांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता पोलिसांनी प्रदीपला कारवाईचे अश्वासन दिले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> डोंबिवलीतील हायप्रोफाइल परिसरात सापडला महाकाय अजगर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT