Crime: वासनांध पत्नी, प्रियकर अन् पतीच्याच पैशाने… हादरवून टाकणारी घटना

ADVERTISEMENT

wife pays lakhs of rupees to kill rickshaw puller husband for old lover
wife pays lakhs of rupees to kill rickshaw puller husband for old lover
social share
google news

Love Crime: ज्या अग्नीला साक्षी मानून आणि ज्याच्यासोबत सात फेरे घेतले, ती पत्नीच (Wife) विश्वासघातकी निघाली. कारण होतं तिच्या पूर्वायुष्यातील प्रियकर (boyfriend). कारण तिला त्याला मिळवायचे होते. त्यासाठी तिने प्रियकरच्याच मदतीने आपल्या नवऱ्याची हत्या (murder Plan) करण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन पत्नीबरोबरच सुपारी घेणाऱ्यांना 5 जणांना अटक केली आहे.

प्रियकरासाठी पतीच्या हत्येचा प्लॅन

दसऱ्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी जमुई जिल्ह्यातील लाचुआड परिसरातील जाजल मोडजवळ भाड्याच्या वादातून एका ई-रिक्षा चालकावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन पर्दाफाश केला. या गोळीबार प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, अनैतिक संबंधातूनच ई-रिक्षा चालकावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा >> MLA Disqualification case : ’31 डिसेंबरच्या आत निर्णय घ्या’, सुप्रीम कोर्टात नार्वेकरांना झटका

रिक्षात बसून गोळ्या झाडल्या

जाजल मोडजवळील सिकंदरा येथे 24 ऑक्टोबर रोजी ई-रिक्षा चालक राजा कुमार यांच्यावर गुन्हेगारांनी 3 गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी गुन्हेगारांनी रिक्षाचालकावर मागून हल्ला करून सलग 3 गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या ई-रिक्षा चालकाला प्रथम जमुई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्यामुळे त्यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे सध्या जखमी राजा कुमार यांच्यावर पाटणामधील पीएमसीएचमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी जमुईचे पोलीस अधीक्षक डॉ. शौर्य सुमन यांनी एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि घटनेत सहभागी असलेल्या जखमी रिक्षा चालक राजा कुमारच्या पत्नीसह 5 जणांना शस्त्रं आणि रोख रकमेसह अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डाव पत्नीने आखला

पोलिस अधीक्षक डॉ. शौर्य सुमन यांनी सांगितले की, या प्रकरणातील अभयपूरमधील रहिवासी छोटू ठाकूर उर्फ ​​नामदेव, सोनू कुमार, विष्णू कुशवाह या आरोपींना अटक केली आहे. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी, देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि रोख 80 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा डाव केल्याबद्दल मरकट्टामधून अमितकुमार ठाकूर आणि सिकंदर येथून राजा कुमारची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक केली आहे.

हे ही वाचा >> Navi Mumbai: आई टोमणे मारायची म्हणून.. मध्यरात्री मुलाचं भयंकर कृत्य

लग्नापूर्वीचे प्रेमाचे संबंध

पोलिस अधीक्षकांनी असेही सांगितले की, रिक्षा चालक राजाची पत्नी लक्ष्मीचे लग्नापूर्वीच अमित कुमार ठाकूरसोबत अनैतिक संबंध होते. तिचे लग्न झाल्यानंतरही अमित ठाकूर अनेकदा तो या मैत्रिणीसोबत तो तिच्या घरी गेला होता. त्यामुळे रिक्षाचालक आणि पत्नीला राजाची अडचण वाटत होती. त्यामुळे राजाच्या पत्नीने राजाला आपल्या प्रेमातून बाजूला करण्यासाठी प्रियकर अमितकुमार ठाकूर आणि अभयपूर येथील छोटू, सोनू आणि विष्णू या सुपारी घेऊन हत्या करणाऱ्यांना पती राजचाची सुपारी देण्यात आली.

ADVERTISEMENT

रिक्षा भाडोत्री घेण्याचं नाटक

यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 80 हजारची सुपारीही जप्त करण्यात आली आहे. रिक्षाचालक राजाला संपवण्यासाठी सुपारी घेतल्यानंतर त्याने 23 ऑक्टोबर रोजी राजाला ठार मारण्याची योजना आखली. यासाठी छोटू कुमारने राजाला फोन करून त्याची ई-रिक्षा भाड्याने घेण्याचा प्रयत्न केला. छोटूने सांगितले की त्याला खारगौरला जायचे आहे, त्यासाठी त्याला त्याची ई-रिक्षा भाड्याने घ्यायची आहे. पण त्यादिवशी राजाच्या ई-रिक्षात बॅटरी नव्हती म्हणून त्याने त्याच्या मित्राचा नंबर छोटूला दिला होता. यावेळी त्याच्या जागी त्याच्या मित्राला पाठवले होते. राजाच्या जागी आणखी काही तरुण ई-रिक्षा घेऊन आल्याचे पाहताच छोटू आणि त्याच्या साथीदारांनी त्यावेळी ती वेळ मारुन घेऊन गेले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Manoj Jarange: ‘या सरकारला एकाचा बळी घ्यायचाय तर…’, जरांगे-पाटलांना अश्रू अनावर!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT