Crime : मित्राच्या बायकोसोबत संबंध अन् झाला भयंकर अंत, तिसऱ्या मजल्यावरून…
आपल्याच मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या पतीने साथीदारांसह पत्नीच्या प्रियकराला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले.
ADVERTISEMENT

Crime News : मित्राच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध ठेवणं तरुणासाठी जीवघेणं ठरलं. मित्राचे आणि आपल्या बायकोचे संबंध असल्याचे कळल्यानंतर जे घडलं, जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. गुरुग्राममध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात त्याच्या मित्राचाही समावेश आहे. (wife’s illegitimate relationship, husband killed wife’s lover)
आपल्याच मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या पतीने साथीदारांसह पत्नीच्या प्रियकराला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. 26 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
वाचा >> Crime : दगडाने ठेचून मारण्यापूर्वी साक्षीसोबत कुणी ठेवले शारीरिक संबंध?
एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सेक्टर-१७/१८ पोलीस स्टेशनला सिरहोळ गावात एक व्यक्ती छतावरून पडल्याची माहिती मिळाली होती. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाला उपचारासाठी सेक्टर-10 सरकारी रुग्णालयात दाखल केले, तेथे 26 वर्षीय अब्दुल सहरोजचा मृत्यू झाला.
पतीने घेतला पत्नीच्या प्रियकराचा बदला
या अपघातानंतर मृत अब्दुल सहरोजचे मामा मोहम्मद आसिफ यांनी पोलिसांना सांगितले की, त्याचा भाचा सिरहोळ गावात राहत असून, तो ग्लास अॅल्युमिनियम फॅब्रिकेटिंगचे काम करत असे. त्याच्या पुतण्याचे सिरहोळ गावातीलच एका महिलेशी अवैध संबंध होते.










