चार मुलांच्या आईवर शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून पाशवी बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

woman a mother of four children raped 24 year old youth bihar crime latest marathi news
woman a mother of four children raped 24 year old youth bihar crime latest marathi news
social share
google news

Rape Case: मुझफ्फरपूर: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur) चार मुलांच्या आईवर शेजाऱ्याने पाशवी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पाठलाग करून आरोपी तरुणाला पकडलं. त्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी पळून थेट आपल्या घरात जाऊन लपला. (woman a mother of four children raped 24 year old youth bihar crime latest marathi news)

ADVERTISEMENT

त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराला चारही बाजूने घेराव घालून घरातूनच अटक केली. सध्या पीडित महिलेवर एसकेएमसीएच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण मनियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. पीडित महिला येथे तिच्या माहेरी एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती.

हात-पाय दोरीने बांधून तोंड दाबून महिलेवर बलात्कार

दरम्यान, रविवारी मध्यरात्री शेजारी राहणारा 24 वर्षीय तरुण हा अचानक घरात घुसला. यानंतर त्याने महिलेचे हात पाय दोरीने बांधले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर त्याने पाशवी बलात्कार केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> मोबाइल गेममधून सुरु होतं मुलांचं धर्मांतर, काय आहे मुंब्रा कनेक्शन?

बलात्कारानंतर आरोपी तरुण हा घटनास्थळावरून पळू लागला. दरम्यान, महिलेने आपल्या पायाला बांधलेली दोरी कशीतरी सोडवली आणि ती खोलीबाहेर आली आणि तिने जोरात आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आणि महिलेच्या नातेवाईकांनी पाठलाग करून आरोपी तरुणाला तात्काळ पकडलं.

पोलिसांना पाहताच आरोपी घरात लपला

यानंतर लोकांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमला या घटनेची तात्काळ माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपी पळून आपल्या घरात लपला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला त्याच्या घरातून अटक केली.

ADVERTISEMENT

आरोपीने महिलेच्या घरात नेमका कसा केला प्रवेश?

पीडित महिलेने सांगितले की, ‘रात्रीचे जेवण करून मुलांना झोपवून आम्ही झोपायला गेलो होतो. घराचे सर्व दरवाजे बंद होते.. पण दाराखाली एक लहान छिद्र होते, ज्यामध्ये एक वीट लावलेली होती. प्रवीणने ती वीट बाजूला काढून अचानक घरात प्रवेश केला.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Politics News in Marathi : भाजपचा 2024 साठी काय आहे ‘घर वापसी’ प्लान?

‘त्याने माझे हात-पाय बांधले आणि तोंड दाबून माझ्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर तो दरवाजा उघडून पळून गेला. मी मोठ्या प्रयत्नाने पायातील दोरी सोडवून बाहेर आले आणि घरच्यांना सगळा प्रकार सांगितला.’ असा संपूर्ण प्रसंग पीडित महिलेने यावेळी सांगितला.

पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या, तुरुंगात रवानगी

या प्रकरणी एसएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, रविवारी रात्री उशिरा मनियारी पोलिस स्टेशन अंतर्गत हे प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिलेने आणि तिच्या कुटुंबाने 112 नंबरवर कॉल केला. यानंतर पोलीस तातडीने तेथे पोहोचले.

तेथे एका तरुणाला पकडून ठेवण्यात आले होते. तरुणाने घरात घुसून महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. महिलेचे वैद्यकीय चाचणी आणि तिचा जबाब हा न्यायालयात नोंदवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT