Mumbai : भटक्या कुत्र्यांना खायला घालणं तरूणीला पडलं महागात; झाली बेदम मारहाण!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Young Man Brutally Beat up Girl who was Feeding Stray Dogs in Mumbai
Young Man Brutally Beat up Girl who was Feeding Stray Dogs in Mumbai
social share
google news

Mumbai Crime News : मुंबईत भटक्या कुत्र्यांना खायला घालणे एका मुलीला महागात पडलं आहे. रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालत असताना अचानक एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीच्या घरच्यांनी याला विरोध केल्यावर त्याने त्यांच्याशी हाणामारीही केली. हे प्रकरण एमएचबी परिसरातील पॉश कॉलनीचे आहे. (Young Man Brutally Beat up Girl who was Feeding Stray Dogs in Mumbai)

ADVERTISEMENT

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अमन बनसोडे याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमन बनसोडे हा त्याच्या मित्रांसह कॉलनीबाहेर उभा होता. तिथे काही भटके कुत्रेही होते. तेवढ्यात एक मुलगी तिथे आली आणि कुत्र्यांना खाऊ घालू लागली. अमनने त्यावेळी मुलीला सांगितलं की, वाटेत कुत्र्यांना खायला नको घालू.

वाचा: ‘आरक्षणासाठी पदाचा-सत्तेचा विचार करू नये’, जरांगे-पाटलांनी साधला निशाणा

मुलीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. अमनने तिला पुन्हा तेच सांगितलं. त्यानंतर त्याचा तरुणीसोबत वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की अमनने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून मुलीचे कुटुंबीय तिथे आले. अमनची त्याच्याशीही हाणामारी झाली. यावेळी कोणीतरी या भांडणाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला.

हे वाचलं का?

वाचा: प्रेमाच्या आड पती येताच, तोडलं आणि अंगणात पुरलं, संशय नको म्हणून…

सध्या याप्रकरणी कारवाई सुरू आहे. याप्रकरणी दोन्ही पक्षांकडून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. डीसीपी अजय बन्सल यांनी सांगितले की, अमन हा गुन्हेगारी प्रकारचा मुलगा आहे. त्याच्यावर यापूर्वीही मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT