Sharad Mohol : भावाची हत्या झाली त्याच ठिकाणी ठोकलं शरदला, पुण्यातील गँगवॉरचा इतिहास काय?
संजय मोहोळ नंतर आता शरद मोहोळचीही हत्या करण्यात आली, तीही ज्या जागी संजय मोहोळला मारले होते, त्याच ठिकाणी. शरद मोहोळच्या हत्येमुळे आता पुन्हा एकदा पुण्यातील गँगवॉर उफाळून आलं आहे.
ADVERTISEMENT

Pune Murder: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Pawar) कोथरुड परिसरात तिघा हल्लेखोरांनी बाईकवरून येऊन अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर सह्याद्री रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळ पुण्यातल्या मोहोळचा गँगचा सूत्रधार होता. ज्या ठिकाणी त्याचा भाऊ संदीप मोहोळची (Sandip Mohol) हत्या झाली त्याच ठिकाणी शरद मोहोळचीही हत्या (Murder) करण्यात आली. पण, यानंतर पुण्यात गँगवार (Gangwar) भडकणार का? पुण्यात इतकं गँगवार का वाढला? पुण्यात गँगवारचा जन्म कसा झाला? त्याचाच हा वृत्तांत.
जमिनीच्या किंमती वाढल्या
ही गोष्ट आहे साधारण 80 च्या दशकातील. पुण्यात दोन गँग उदयास आल्या होत्या. त्यावेळी गुन्ह्याचं स्वरुप मटके, खंडणी, अवैध मालमत्ता अशा प्रकारचे होते. पुढे 90 च्या दशकात पुण्याचा विस्तार होऊ लागला तशी पुण्याची जुनी ओळख पुसली जाऊ लागली. पुणे हे आयटी हब बनत होतं. मोठमोठ्या कंपन्या येत होत्या. त्यासाठी जमिनीची गरज भासू लागली. पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जमिनीच्या किंमती वाढल्या. या परिसरात ज्यांच्या जमिनी होत्या ते कोट्यधीश झाले. यातून आपण कोट्यधीश होऊ शकतो ही भावना अनेकांच्या मनात आली.
हे ही वाचा >> शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकिलांचा हात, हत्याकांडात नेमका काय होता रोल?
खऱ्या टोळीयुद्धाला सुरुवात
उद्योगपतींना जमीन हवी होती आणि ती मिळवून देण्यासाठी एजंट्सची संख्या वाढू लागली. याच जमिनी मिळवून देण्यासाठी दादागिरी, गुंडगिरीचा वापरही झाला आणि त्यातूनच पुण्यात गँगवारचा जन्म झाला. यामध्ये पहिली ठिणगी पडली ती 2005 मध्ये. मारणे टोळीतल्या अनिल मारणेवर हल्ला करण्यात आला आणि त्याचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. त्यानंतर 2006 ला मारणे टोळीच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती आणि यानंतर खऱ्या टोळीयुद्धाला सुरुवात झाली.