Crime : ATM मशीनला धक्काही नाही पण बँकेला लाखो रुपयांचा चुना…

मुंबई तक

वाशिम (ज़का खान) : पैसे काढताना ‘एटीएम’ मशिनमध्ये तांत्रिक बिघाड करुन लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे. तर एक जण यापूर्वीच कारागृहामध्ये आहे. हे सर्व जण उत्तर प्रदेशातील आहेत. दरम्यान, या टोळीचा चोरी करण्याचा अनोखा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वाशिम (ज़का खान) : पैसे काढताना ‘एटीएम’ मशिनमध्ये तांत्रिक बिघाड करुन लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे. तर एक जण यापूर्वीच कारागृहामध्ये आहे. हे सर्व जण उत्तर प्रदेशातील आहेत. दरम्यान, या टोळीचा चोरी करण्याचा अनोखा फंडा बघून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ‘एटीएम’मधून सात लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यात आली आहे. ही रक्कम काढताना संशयित आरोपी एटीएममधून पैसे निघताना Dispensing Shutter ठिकाणी दोन बोट आडवी ठेवून त्याच्या साह्याने वितरण यंत्रणेच्या रोलसिलला आत ढकलायचे आणि मशीनमध्ये बिघाड करायचे. त्यामुळे मशीन तांत्रिक बिघाड गृहीत धरुन आरोपींना प्रत्यक्षात रक्कम मिळाली तरी त्यांच्या खात्यातून रक्कम वजा होत नव्हती.

दरम्यान, या गुन्ह्यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या दहा बँकेचे स्वतःच्या खात्याचे वीस ‘एटीएम’कार्ड वापरल्याचं समोर आलं आहे. मुख्य संशयित आरोपी अरविंद कुमार अवस्थी (रा. कानपूर, उत्तर प्रदेश) हा त्याच्या जवळचे वेगवेगळे एटीएम कार्ड इतर आरोपींना देऊन परराज्यातील मशीन्समधून पैसे काढण्यास सांगत असे.

तपास करतेवेळी पोलिसांना आढळून आलेले सीसीटीव्ही फुटेज, आरोपींचे बँक अकाउंट नंबर्स आणि त्याला संलग्न असलेले इतर मोबाईल नंबर्स यावरून आरोपी पकडण्यात आले. वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर आरोपींमध्ये वैभव ऋषभदेव पाठक (२३), सत्यम शिवशंकर यादव (२३), सौरभ मनोज गुप्ता (२१), प्रांजल जयनारायण यादव (२४) यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी मुख्य आरोपी अरविंद कुमार अवस्थी याच्यावर यापूर्वी देखील पोलीस स्टेशन कलेक्टरगंज कानपूर उत्तर प्रदेश येथे 420 अन्वये गुन्हा दाखल असून तो सध्या कानपूर कारागृहात आहे. त्याला ताब्यात घेऊन अधिक तपास करणार असल्याची माहिती वाशिम पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp