मोहाली विद्यापीठ प्रकरण: एक मुलगी बेशुद्ध, बॉयफ्रेंडला अटक; आतापर्यंत काय घडलं?

पोलीस प्रियकराची चौकशी करत आहेत. त्याच्या माध्यमातून अनेक खुलासे होत आहेत.
मोहाली विद्यापीठ प्रकरण: एक मुलगी बेशुद्ध,  बॉयफ्रेंडला अटक; आतापर्यंत काय घडलं?

मोहालीतील एका खासगी विद्यापीठात अंघोळ करतानाचा विद्यार्थिनींचा व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी आरोपी विद्यार्थीनीच्या प्रियकराला शिमला येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रियकराची चौकशी करत आहेत. त्याच्या माध्यमातून अनेक खुलासे होत आहेत. आरोपी विद्यार्थीनीनंतर या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.

मोहाली विद्यापीठातील 60 मुलींचे व्हिडिओ केले रेकॉर्ड

विद्यार्थीनींचा व्हिडिओ लीक झाल्याच्या प्रकरणाने वातावरण तापलं आहे. विद्यापीठाचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. प्रशासन आणि विद्यापीठ व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. वाढता गोंधळ पाहून विद्यापीठ प्रशासनाने 2 दिवस (19 आणि 20 सप्टेंबर) कॉलेज बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा दावा आहे की आरोपी विद्यार्थीनीने 50-60 मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत.

विद्यार्थीनीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्याने सांगितले की, एक विद्यार्थीनी बेशुद्ध झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. कोणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही. व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपी विद्यार्थीनीला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. या प्रकरणाची सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. आरोपी विद्यार्थीनीची चौकशी करण्यात येत आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे

या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चंदीगड विद्यापीठाची घटना ऐकून दुःख झाल्याचे म्हटले आहे. आमच्या मुली हा आमचा अभिमान आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, अफवांवर विश्वास ठेवू नका.

आरोपी मुलीचा मोबाईल तपासासाठी पाठवला

मोहालीचे एसएसपी विवेक सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थीनीने चौकशीत सांगितले आहे की, तिने इतर कोणत्याही विद्यार्थीनींचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले नाहीत. आता आम्ही या प्रकरणाचाही तपास करत आहोत आणि हे व्हिडीओ का पाठवण्यात आले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत असे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in