Atiq Ahamad : सनी, लवलेश आणि अरुण; तिघांनी अतिक-अशरफची का केली हत्या?

मुंबई तक

Atiq Ahmed, brother Ashraf shot dead updates : अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांना पोलीस शनिवारी (15 एप्रिल) रात्री वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. त्याचवेळी आलेल्या तीन तरुणांनी गोळ्या झाडल्या… तिन्ही तरुण वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत.

ADVERTISEMENT

Atiq Ahmed and brother shot dead in Prayagraj : who are the three accused?
Atiq Ahmed and brother shot dead in Prayagraj : who are the three accused?
social share
google news

गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला आणि माजी खासदार राहिलेल्या गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अजीम ऊर्फ अशरफ अहमदची शनिवारी (15 एप्रिल) रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रयागराजमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाने उत्तर प्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 म्हणजे जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेले तिन्ही आरोपी हे प्रयागराजमधील नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

आरोपींना व्हायचंय मोठा माफिया?

अतिक अहमद आणि अशरफ अहमदची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे. तिन्ही आरोपींवर कुठे कुठे आणि कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. सुरूवातीच्या चौकशीत आरोपींनी सांगितलं की, त्यांना मोठा माफिया व्हायचं आहे आणि त्यामुळेच त्यांनी दोघांच्या हत्या केल्या.

हेही वाचा >> पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अतिक-अशरफची गोळ्या झाडून हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद

आरोपींनी सांगितलं की, “कधीपर्यंत छोटे मोठे शूटर राहायचं? मोठा माफिया व्हायचं आहे, त्यामुळेच हे हत्याकांड घडवून आणलं.” आरोपींनी अशा स्वरूपाचं उत्तर दिलं असलं, तरी पोलिसांकडून वेगवेगळ्या अंगाने तपास सुरू करण्यात आला आहे. कारण तिन्ही आरोपींच्या विधानांमध्ये विरोधाभास असल्याचं पोलीस चौकशीतून दिसून आलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp