याकूब मेमनच्या कबरीवरून वाद का निर्माण झाला आहे? उद्धव ठाकरेंवर भाजपचे आरोप काय?
१९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. याच प्रकरणातलं एक नाव म्हणजे दहशतवादी याकूब मेमन. याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान भागात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याकूब मेमनची कबर पुन्हा चर्चेत आली आहे. तसंच यावरून भाजपने ठाकरे सरकारवर भाजपने आरोप केले आहेत. काय आहे याकूब मेमनच्या कबरीचं प्रकरण? […]
ADVERTISEMENT

१९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. याच प्रकरणातलं एक नाव म्हणजे दहशतवादी याकूब मेमन. याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान भागात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याकूब मेमनची कबर पुन्हा चर्चेत आली आहे. तसंच यावरून भाजपने ठाकरे सरकारवर भाजपने आरोप केले आहेत.
काय आहे याकूब मेमनच्या कबरीचं प्रकरण?
याकूब मेमनच्या कबऱीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत याकूब मेमनची कबर लाईट लावून सजवण्यात आली आहे. तसंच त्या कबरीला मार्बल लावण्यात आलं आहे असं दिसतं आहे. याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान या ठिकाणी त्याचा अंत्यविधी झाला. फाशी देण्यात आल्यानंतर पोलिसांना याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. मरीन लाईन्स स्टेशनजवळ असलेल्या बडा कब्रस्तान भागात याकूब मेमनचं पार्थिव दफन करण्यात आलं.
याकूबच्या कबरीवरून राजकारण काय रंगलं आहे?
याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण असं रंगलं आहे की भाजपने आता थेट या प्रकरणी आधीच्या सरकारवर म्हणजेच ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. याकूबच्या कबरीला मजारचं स्वरूप आलं आहे. मुंबईचा गुन्हेगार असलेल्या याकूब मेमनच्या कबरीला मजारचं स्वरूप येणं ही बाब दुर्दैवी आहे या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.