Murder Case : केंद्रीय मंत्र्याच्या घरात तरुणाची गोळी घालून हत्या, पिस्तुल केले जप्त
Murder Case : केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या घरामध्येच एका युवकाची गोळी घालून हत्या केली आहे. त्यासाठी वापरलेली पिस्तुलही त्यांच्याच मुलाची आहे.
ADVERTISEMENT

Murder Case : उत्तर प्रदेशमधील मोहनलाल गंजचे खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री कौशल किशोर (Kaushal Kishore) यांच्या लखनऊ येथील घरामध्ये युवकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. मृत झालेल्या युवकाचे नवा विनय श्रीवावस्तव अशी ओळख सांगण्यात येत आहे. विनय कौशल हा किशोरचा मुलगा विकास किशोर याचा मित्र असून त्याच्यासोबत राहत होता. हत्या झाल्यानंतर पोलिसांनी पिस्तुल जप्त केली असून विनय श्रीवास्तव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (young boy killed by his son pistol in Union Minister Kaushal Kishore Lucknow Uttarpradesh)
कुटुंबीयांचा थेट आरोप…
घटना घडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, केंद्रीय राज्य मंत्री कौशल किशोर यांच्या ठाकुरगंज येथील बेगरिया येथे ही घटना घडली आहे. विनय श्रीवास्तव यांच्या पिस्तुलमधून गोळी मारून विनय श्रीवास्तव याची गोळी मारून हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक करुन त्यांनी ताब्यात घेण्यात आली आहे. विनय श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाची हत्या करण्यात आली असून तशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे.
हे ही वाचा >> INDIA Alliance : वाद टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरला; वाचा मुंबई बैठकीची Inside Story
खाणंपिणं करुन केली हत्या
पश्चिमम लखनऊचे पोलीस आयुक्त राहुल यांनी सांगितले की, विनय श्रीवास्तव यांची गोळी मारून हत्या करण्यात आली असून त्याच्या डोक्यातही जखम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जेवण झाल्यानंतरही त्याची गोळी घालून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येसाठी वापरलेली पिस्तुल ही विकास किशोर याची असून घटनास्थळावरून पिस्तुलसह अनेक वस्तु पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याच बरोबर सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी घेतले असून त्यानुसारही तपास केला जाणार आहे. विनय श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
माझा मुलगा तिथं नव्हताच
ही घटना घडल्यानंतर कौशल किशोर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या घटनेची माहिती मला मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांना तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पोलीस आतापुढील तपास करत आहेत. आम्ही मृत विनय श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयासोबत आहोत. मात्र घटना घडली त्यावेळी माझा मुलगा तिथे उपस्थित नव्हता. मात्र पोलिसांनी त्याची पिस्तुल जप्त केली आहे. पोलीस घटनेचा तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.