Lok Sabha Election : मविआमध्ये पहिलं बंड! ठाकरेंची वाढली कटकट, भाजपला होणार फायदा?

भागवत हिरेकर

Sangli lok Sabha election 2024 Latest News : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणित पूर्णपणे बदलून गेले आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली लोकसभा निवडणूक २०२४

point

विशाल पाटील यांनी भरले दोन अर्ज

point

चंद्रहार पाटील यांनी बोलून दाखवली नाराजी

Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप केलं. तिन्ही पक्षाचे नेते प्रचारातही गुंतले आहेत. पण, ठाकरेंची कटकट वाढता दिसत आहे. या डोकेदुखीचं कारण ठरली आहे सांगलीची जागा. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडीत पहिलं बंड सांगलीत झालं आहे. पण, यामुळे भाजपची लढाई सोपी होणार आहे, असे म्हटले जात आहे. (Sangli Lok Sabha Election Explained)

"विशाल पाटील यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म भरलेला नाही. पण, एबी फॉर्म शेवटच्या क्षणीही दिला जाऊ शकतो. त्यामुळे 19 एप्रिलपर्यंत तीन वाजेपर्यंत मुदत आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले आहेत. एक काँग्रेस पक्षाकडून आणि एक अपक्ष म्हणून", अशी माहिती काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी दिली. 

विश्चजीत कदम सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्यांनी या जागेसाठी मुंबई आणि दिल्लीच्याही वाऱ्या केल्या. पण, ठाकरेंनी जागावाटपाच्या जाहीर होण्याआधीच उमेदवार घोषित केल्याने सांगलीतील काँग्रेस नाराज आहे. 

सांगलीत मविआच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह

सांगली लोकसभा निवडणुकीसंदर्भात सांगलीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती. पण, या बैठकीकडे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली. काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील आपली नाराजी लपवू शकले नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp