प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन! पत्नीचाच अश्लील व्हिडीओ बनवला अन् 10 लाखांची मागणी...

मुंबई तक

पीडितेच्या पतीने पत्नीला नशेचं औषध देऊन तिचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी आरोपी पती त्याच्या पत्नीकडून 10 लाख रुपयांची मागणी करत असल्याचं पीडितेनं सांगितलं.

ADVERTISEMENT

पत्नीचाच अश्लील व्हिडीओ बनवला अन्...
पत्नीचाच अश्लील व्हिडीओ बनवला अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन!

point

पत्नीचाच अश्लील व्हिडीओ बनवला अन्...

point

पत्नीकडूनच केली 10 लाख रुपयांची मागणी

Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथून नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच पती आणि सासू-सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर सुद्धा हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचं महिलेचं म्हणणं आहे. एके दिवशी, पीडितेच्या पतीने पत्नीला नशेचं औषध देऊन तिचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी आरोपी पती त्याच्या पत्नीकडून 10 लाख रुपयांची मागणी करत असल्याचं पीडितेनं सांगितलं. 

पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवला अन्...

तसेच, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा पीडित विवाहितेने आरोप केल आहे. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी तो पत्नीचा सतत छळ करायचा. संबंधित प्रकरण हे गोरखनाथ पोलीस स्टेशन परिसरातील असल्याची माहिती आहे. सोमवारी एका महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या पतीवर गंभीर आरोप करत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोपी पतीने पीडितेचा अश्लील व्हिडीओ बनवला असून तो डिलीट करण्यासाठी 10 लाखांची मागणी करत असल्याचा आरोप पीडित महिलेनं केला. 

हे ही वाचा: घरच्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची अन् दिवसा घरातच प्रियकरासोबत संबंध... पुण्यातील व्यावसायिकाच्या सुनेचं धक्कादायक कृत्य!

दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक संबंध 

पीडिता म्हणाली की, लग्न झाल्यापासून माझ्या सासरच्या मंडळींनी मला वाईट वागणूक दिली आहे. माझा नवरा सीतापूरमधील एका कारखान्यात काम करत असून तिथे काम करणाऱ्या एका तरुणीशी त्याचे अनैतिक संबंध आहेत. त्याच्याशी लग्न करण्यासाठी तो मला ब्लॅकमेल करत आहे." पीडितेच्या म्हणण्यानुसार, पत्नीने तिच्या पतीच्या या कृत्याला विरोध केला असता त्याने पत्नीच्या विरोधात एक प्लॅन बनवला. एके दिवशी, आरोपीने पत्नीला मादक पदार्थ खायला देऊन तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर, तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. 

हे ही वाचा: "पती अनोळखी पुरुषांसोबत संबंध ठेवायला सांगायचा..." 4 मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली अन् कोर्टात भलतंच सांगितलं...

पोलिसांचा तपास 

आरोपी पतीने पीडितेचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी त्याने विवाहितेकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता प्रकरणाचा पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp