Lok Sabha Elections 2024 : भाजपची आणखी एका पक्षासोबत युतीची चर्चा फिस्कटली!

मुंबई तक

BJP SAD Alliance : भाजपने पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली, शिरोमणी अकाली दलासोबत युतीबाबत चर्चा फिस्कटली आहे.

ADVERTISEMENT

पंजाबमध्ये भाजप-शिरोमणी अकाली दल स्वतंत्रपणे लढणार, हे स्पष्ट झाले आहे.
भाजपने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिरोमणी अकाली दल आणि भाजपने 2019 मध्ये युतीत लढवली होती निवडणूक

point

तीन कृषी कायद्यामुळे भाजपची तोडली युती

point

पंजाबमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार

BJP Breaks Alliance with SAD : ओडिशामध्ये बीजेडीसोबतची युती फिस्कटल्यानंतर भाजपने एनडीएतील आणखी एक मित्रपक्ष गमावला आहे. पंजाबमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शिरोमणी अकाली दलासोबतची भाजपची युती संपुष्टात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये स्वबळाव लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शिरोमणी अकाली दलाशी युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली. राज्यातील जनता आणि कार्यकर्त्यांच्या मतांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे जाखड म्हणाले. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपावरुन भाजप आणि शिरोमणी अकाली दलात मतभेद होते, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होऊ शकली नाही. अकाली दलाने 9 जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि उर्वरित चार जागा भाजपला देण्याची ऑफर दिली होती. तथापि, भाजपने जागावाटपात मोठा वाटा मागितला होता.

2019 मध्ये युतीत लढवली होती निवडणूक

शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) भाग म्हणून भाजपसोबत पंजाबमध्ये 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही पक्षांना फारसे चांगले यश मिळाले नाही. काँग्रेसने 13 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. गुरुदासपूर आणि होशियारपूरच्या जागा भाजपच्या वाट्याला गेल्या होत्या. अकाली दलाने फिरोजपूर आणि भटिंडा या जागा जिंकल्या होत्या. आम आदमी पक्षाने संगरूरची जागा जिंकली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp