Lok Sabha : ''उद्धव ठाकरेंनी 18 खासदार निवडून दाखवावेत'', कुणी दिलं आव्हान?
Udhhav thackeray : ''2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून 18 खासदार विजयी झाले होते. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी तेवढेच खासदार विजयी करून दाखवावे.
ADVERTISEMENT
BJP Chandrashekhar bawankule direct challenge to Udhhav thackeray : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील समारोप सभेनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजपने या सभेतील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरून आणि भाषणावरून त्यांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. असे असताना आता उद्धव ठाकरेंनी लोकसभेत महाराष्ट्रातून 18 खासदार निवडून दाखवावे, असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. (bjp chandrashekhar bawankule direct challenge to udhhav thackeray should elect 18mps rohul gandhi sharad pawar maharashtra politics)
ADVERTISEMENT
नागपूरच्या कोराडी येथे बुथस्तरीय कार्यसमिती बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीवर बोलताना बावनकुळेंनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. ''2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून 18 खासदार विजयी झाले होते. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी तेवढेच खासदार विजयी करून दाखवावे, असे थेट आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना दिले आहे.
हे ही वाचा : खरंच अशोक चव्हाण सोनिया गांधींसमोर रडले का?
बावनकुळे पुढे म्हणाले की, काल इंडी आघाडीच्या मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे केली नाही. मताच्या राजकारणाकरिता उद्धव ठाकरे यांनी लाचारी पत्करली. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनच्या मांडीला मांडी लावून बसले. हिंदू आणि ओबीसींचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींना ते शरण गेले, अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी ठाकरेंवर केली.
हे वाचलं का?
दरम्यान राहुल गांधींचे कालचे भाषण हास्यजत्रा होती. त्यांच्या भाषणात विकासाबद्दल आणि व्हिजनबद्दल काहीच नव्हते. केवळ त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकाच केली. तर शरद पवार यांची परिस्थिती बारामतीच्या बाहेर जाणार नाही अशी झाली आहे. एक परिवार, एक मतदारसंघात ते अडकले आहेत,असा हल्ला बावनकुळेंनी शरद पवारांवर चढवला. तसेच नवनीत राणा यांनी अमरावती मधून प्रचाराला सुरुवात केली आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, नवनीत राणा अद्याप भाजपात आल्या नाही आहेत.
हे ही वाचा : बारामतीत जाऊन अजित पवारांना नालायक म्हणणारे 'श्रीनिवास पवार' आहेत तरी कोण?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT