Lok Sabha Election 2024 : भाजपची 'रिपोर्ट कार्ड' स्ट्रॅटजी! उमेदवारांना काय करावं लागणार?
Lok Sabha Election 2024 bjp campaign strategy : भाजपने महाराष्ट्रात अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी वेगळी रणनीति तयार केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची खास रणनिती
उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार रिपोर्ट कार्ड
मोदींचा फोटो मोठा, तर उमेदवाराचा फोटो असणार छोटा
BJP Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात मिशन 45 समोर ठेवून भाजपा कामाला लागली आहे. आता प्रचारात आघाडी घेऊन अधिकाधिक यश मिळवण्यासाठी भाजपने रिपोर्ट कार्ड रणनीती आखली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला प्रचार करताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमदेवारांकडून प्रचार कसा सुरू आहे? प्रचारात कोणत्या उणीवा राहत आहेत का आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्या, कोणत्या करायला हव्यात, यासाठी भाजपने खास प्लॅन केला आहे. त्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या उमेदवारांना दिली.
हेही वाचा >> ''विरोधकांना पश्चाताप होईल''! Electoral Bond वरून PM मोदी असं का म्हणाले?
मिळालेल्या माहितीनुसार बावनकुळे यांनी राज्यातील भाजप उमदेवारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत बावनकुळे उमेदवारांना महत्त्वाची माहिती दिली.
हे वाचलं का?
रोज रात्री 11 वाजता रिपोर्ट कार्ड
उमेदवारांनी प्रचार यंत्रणा कशी राबवायला हवी, काय करायला हवे, यासंदर्भात पक्षाकडून रिपोर्ट कार्ड दिले जाणार आहे. प्रचाराची पद्धत, मतदारसंघात प्रचार करताना कोणत्या गोष्टींवर फोकस करायला हवा, हे उमेदवारांना पक्षाकडून सांगितले जाणार असून, त्यानुसार प्रचार यंत्रणा राबवावी, असे बावनकुळे यांनी उमेदवारांना सांगितले.
रिपोर्ट कार्डमध्ये कोणत्या गोष्टी असणार?
लोकसभा मतदारसंघामधील प्रचार यंत्रणेचा समन्वय भाजपच्या केंद्रीय यंत्रणेशी आणि राज्यातील प्रदेश कार्यालयातील यंत्रणेशी राहणार. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय आहे, प्रचार करताना कुठे चुका होत आहेत, त्या कशा पद्धतीने सुधारायच्या आणि उमेदवाराबद्दल लोकांमध्ये काय चर्चा आहे, याची माहिती दरदिवशी दिली जाणार आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, मविआला बसणार झटका?
प्रचार करताना त्याचे स्वरूप कसे असले पाहिजे, यासंदर्भात सर्व उमेदवारांसाठी एक एसओपी सर्व उमेदवारांना पाठवण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. ती बावनकुळे यांनी मान्य केली.
ADVERTISEMENT
सर्वात मोठा मोदींचा फोटो, सर्वात लहान उमेदवाराचा
भाजपकडून उमेदवारांना फोटोसंदर्भातही सूचना देण्यात आल्या आहेत. प्रचारासंदर्भातील कोणत्याही बॅनर, पोस्टर, पॅम्पलेट किंवा इतर ठिकाणी मोदींचा फोटो मोठा ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर कमळ चिन्हाचा फोटो आणि सर्वात लहान फोटो उमेदवारांचा असेल, असा क्रम ठरवून देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT