Eknath Khadse : मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

  eknath khadse again join bjp lok sabha election 2024 sharad ncp bjp maharashtra politics
शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत.
social share
google news

Eknath Khadse Join BJP? : शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या पक्षप्रवेशाची वेळ लवकरच निश्चित होणार आहे. याबाबतची माहिती स्वत: खडसेंनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या पक्षप्रवेशाकडे लागले आहे. या पक्षप्रवेशाने आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. (eknath khadse again join bjp lok sabha election 2024 sharad ncp bjp maharashtra politics)  

ADVERTISEMENT

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या संदर्भातील बातम्या देखील समोर आल्या होत्या. या दरम्यान एकनाथ खडसे दिल्लीला देखील रवाना झाले होते. आता एकनाथ खडसे यांनी तीन दिवसांपूर्वीच दिल्लीत जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता त्याचा पक्षप्रवेश कधी होतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

हे ही वाचा : BJP: 'किरीट सोमय्यांना विचारा..', राऊत असं का म्हणाले?

एकनाथ खडसे हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. तर खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. खडसेंच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांना यंदाच्या लोकसभेसाठी देखील रावेरमधून तिकीट देण्यात आलं होतं. तर शरद पवार खडसेंना सुनेविरोधात निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक होते.मात्र खडसेंनी तब्येतीची कारणास्तव निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

खडसेंनी भाजप का सोडली? 

पुण्यातील जमीन खरेदी-विक्रीचा आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे त्यांनी भाजप देखील सोडली होती. दरम्यान खडसे यांच्यावरील हा खटला अजून सूरूच आहे. तसेच जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्याच्या जावयाला अटक देखील झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटका केल्यानंतर दोन वर्षांनी तो जामिनावर बाहेर आला होता. यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत गेल्यानंतर खडसेंनी त्यांच्याविरुद्ध खटला रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांवर केला होता. खडसे हे महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते आहेत आणि ते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांचे समकालीन आहेत. 

हे ही वाचा : Nitin Gadkari : 'मुनगंटीवारांना शिलाजीत देऊ, काम जोरात होईल; विकासाचं काम..'

दरम्यान जयंत पाटील यांना याबाबत कळवले असून लवकरच ते अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलणार आहेत. या भागात भाजप पुन्हा एकदा मजबूत स्थितीत येणार असल्याचे बोलले जात आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT