Lok Sabha Election 2024 : पूनम महाजन यांचा पत्ता 'या' दोन कारणामुळे कटला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Lok sabha election 2024 why did bjp drop two time sitting mp poonam mahajan mumbai north central lok sabha ujjwal nikam
भाजपने पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना उमेदवारी नाकारण्या मागची नेमकी कारणे काय आहेत?
social share
google news

Mumbai North Central Lok Sabha, Poonam Mahajan : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून भाजपने नवीन चेहरा मैदानात उतरवला आहे. भाजपकडून महायुतीने ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. निकम यांच्या उमेदवारीने भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झालाय. त्यामुळे भापजने दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांना उमेदवारी न दिल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. पण भाजपने पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना उमेदवारी नाकारण्या मागची नेमकी कारणे काय आहेत? ही जाणून घेऊयात.  (Lok sabha election 2024 why did bjp drop two time sitting mp poonam mahajan mumbai north central lok sabha ujjwal nikam) 

खरं तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याच्या सुरूवातीपासूनच पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात येईल अशी चर्चा होती. अगदी दोनच दिवसांपूर्वी 27 एप्रिलला देखील पुनम महाजन यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार नाही, असे बोलले जात होते. आणि तसेच झाले आणि भाजपने ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे.पण नेमकी त्यांना उमेदवारी का नाकारली आहे. याची काही कारणे आहेत.  

हे ही वाचा : 'हे लोकं महिन्याभरात भयंकर घटना..', मोदींचा खळबळजनक आरोप

खरं तर मुंबई भाजप आणि महाराष्ट्र भाजप युनिटने पूनम महाजन यांना उमेदवारी मिळावी, यासाठी शिफारस केली होती. पण भाजपने केलेल्या अतंर्गत सर्व्हेमुळे पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली.  तसेच पूनम महाजन यांच्यावरून पक्षात दोन मतं होती. काहींना वाटतं होतं की पूनम महाजन यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, तर काहींना उमेदवारीला विरोध होता, अशी माहिती आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उमेदवारी नाकारण्यामागे भाजपची स्ट्रेटेजी देखील होती, अशी माहिती आहे. कारण भाजपला  370 चा पल्ला गाठण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची होती. त्यानुसार उत्तर मध्य मुंबईतून एक नवीन चेहरा मैदानात उतरवायचा होता.त्यामुळे हायकमांडने उज्ज्वल निकम यांच्या रूपाने उमेदवार उतरवला आहे. 

हे ही वाचा : Narendra Modi : ''भटकत्या आत्म्यामुळे राज्य अस्थिर...'',

दरम्यान पूनम महाजन यांनी 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य दोनदा जिंकली होती. तिने दोन्ही निवडणुकांमध्ये ज्येष्ठ अभिनेते-राजकारणी आणि काँग्रेस नेते सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांचा चांगल्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे दोन टर्मच्या खासदाराला उमेदवारी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. 

ADVERTISEMENT

आता उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याने, त्यांची लढत थेट काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासोबत होणार आहे. पाचव्या टप्प्यात या जागेसाठी 20 मेला मतदान पार पडणार आहे. तर  निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT