Maharashtra Lok Sabha 2024 : 'वायकरांनी अटक टाळण्यासाठी उमेदवारी घेतली', शिंदेंच्याच नेत्याने टाकला बॉम्ब

मुंबई तक

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर आणि गजानन कीर्तिकर.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांच्याबद्दल गजानन कीर्तिकर यांनी मोठे विधान केले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र वायकरांच्या उमेदवारीबद्दल गजानन कीर्तिकरांचं विधान

point

ईडी चौकशीमुळे उमेदवारी घेतली, असे कीर्तिकर म्हणाले.

point

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणूक २०२४

North West Mumbai Lok Sabha : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या रवींद्र वायकर यांच्याबद्दल गजानन कीर्तिकर यांनी खळबळ उडवून दिली. ईडी चौकशी आणि प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी रवींद्र वायकर यांनी उमेदवारी घेतली, असे कीर्तिकर म्हणाले आहेत. (Gajanan Kirtikar big claim that Ravindra Vaikar is contesting elections to avoid ED inquiry and arrest)

मतदान केल्यानंतर मावळते खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले, "निवडणुकीत सगळे उमेदवार तुल्यबल असतात. काँटे की टक्कर म्हणतात ना, तशी ही स्पर्धा आहे. आज काही सांगता येणार नाही."

तुमचा मुलगा ठाकरे गटात आहे. तुम्ही शिंदेंच्या गटात आहात. तुम्ही कुणाला प्राधान्य दिलं? या प्रश्नाला उत्तर देताना कीर्तिकर म्हणाले, "मी एकनाथ शिंदेंबरोबर आहे. मी त्या पक्षाचा नेता आहे. माझं कर्तव्य आहे की, रवींद्र वायकरांच्या बाजूने जेवढा जमेल, तेवढा मी प्रचार केला आहे. आणि माझं मत देखील रवींद्र वायकर यांच्या धनुष्यबाणाला दिले आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रवींद्र वायकरांबद्दल गजानन कीर्तिकरांचं भुवया उंचावणारं विधान

"रवींद्र वायकर हे आता महिना-दोन महिन्यांपूर्वीचं प्रोडक्ट आहे. त्यांची ईडीची चौकशी झाल्यानंतर... त्यांनीच आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, 'मला अरेस्ट केलं जाईल. त्या भीतीने मी पक्ष बदल केला.' त्यांची आता ईओडब्ल्यूकडे (आर्थिक गुन्हे शाखा) चौकशी चालू आहे", असे गजानन कीर्तिकर म्हणाले.

हेही वाचा >> "शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केलं, तरी आम्ही...", फडणवीसांचं विधान 

पुढे बोलताना कीर्तिकर यांनी सांगितलं की, "आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या चौकशीचा सी समरी (प्रकरण बंद करण्यासंदर्भात दिला जाणारा अहवाल) रिपोर्ट मला द्या. म्हणजे मी उमेदवारी घेईन. म्हणजे त्यांचं अरेस्ट पण चुकलं. ईओडब्ल्यूची टांगती तलवार, तीही संपली", असे म्हणत वायकर यांनी अटक टाळण्यासाठी उमेदवारी घेतल्याचे विधान कीर्तिकर यांनी केले. 

ADVERTISEMENT

वडिलांची उणीव जाणवली, कीर्तिकरांनी व्यक्त केल्या भावना

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतदान केले. यावेळी बोलताना त्यांनी वडिलांची उणीव जाणवली, अशा भावना व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री", भुजबळांना कुणी दिलेली ऑफर? 

अमोल कीर्तिकर म्हणाले, "घरी राजकीय चर्चा होत नाहीत. आजही ते उशिरा मतदान केंद्रावर जाणार आहेत. १०० टक्के गजानन कीर्तिकर यांची उणीव भासली. एखादी व्यक्ती अनेक वर्ष काम करत असते. ती अचानक विरोधात गेल्यावर अडचण होते. मात्र, वडिलांची उणीव भरून काढण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी केले."

हेही वाचा >> फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, मग मोदींनी केला फोन! Inside Story

"वडील आणि मुलगा, आई आणि मुलगा हे नाते वेगळे असते. तुम्ही कितीही काही केले तरी आई वडिलांचं मुलांवर प्रेम असते. तुम्हा दाखवा अथवा नका दाखवू, ते निसर्गाने दिलेले आहे आणि हिंदू संस्कृतीने पण दिले आहे", असे कीर्तिकर म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT