Sharad Pawar: बारामतीत 'श्रमलेला' बाप 'लढणाऱ्या' लेकीसाठी कसं करतायत जीवाचं रान?
Sharad Pawar and Supriya Sule: अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवार हे आपल्या लेकीसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. जाणून घ्या शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत कशी मेहनत घेतायत?
ADVERTISEMENT

Sharad Pawar Baramati: बारामती: 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी...' अजित पवारांनी बंड केलं... राष्ट्रवादी फुटली... तेव्हा सुप्रिया सुळेंनी या ओळी म्हणत फुटीर गटाविरोधात हुंकार भरला... त्यातल्याच 'लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप बुलंद कहाणी...' या ओळीचा प्रत्यय सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात दिसतोय. पुतण्यानेच दंड थोपटल्यानं शरद पवार आपल्या लेकीसाठी जीवाचं रान करताना दिसत आहे. शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत कशी मेहनत घेतायत? पवार लेकीसाठी कशी फिल्डींग लावतायत? हेच सविस्तर जाणून घेऊया. (how the father sharad pawar is working hard for his daughter supriya sule in baramati see what is the real politics in baramati)
मुलीसाठी स्वत: पवार उतरले रिंगणात...
याआधीच्या निवडणुका पाहिल्या तर अजित पवारांसह पवार कुटुंबातले इतर मंडळी प्रचार करत होते. शरद पवार अगदी शेवटच्या प्रचार सभेला यायचे. पण, जशी राष्ट्रवादीत फूट पडली आणि लोकसभा निवडणूक जवळ आली तसे पवार बारामतीत अधिक सक्रीय झालेले दिसतात. कारण, अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातली लढत अंत्यत महत्वाची आहे. इथून सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकप्रकारे सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित केलीय...सुनेत्रा पवार बारामतीत लोकसभा मतदारसंघात दौरे करतानाही दिसतात. त्यांचा प्रचारही सुरू झाला. सुप्रिया सुळेंसोबतच अजित पवारांचाही बारामतीवर होल्ड आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी सुनेत्रा पवारांचं मोठं आव्हान असणार आहे. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची उमेदवारीही जाहीर केलीय. पण पवार फक्त उमेदवारी जाहीर करून थांबले नाहीत. ते बारामती लोकसभा मतदारसंघात लहान लहान सभा आणि मेळावे घेत आहेत.
कार्यकर्ते, शेतकरी, वकील, डॉक्टर, व्यापारी अशा सगळ्या समूहाचे मेळावे घेऊन पवार त्यांच्यासोबत संवाद साधताना दिसत आहेत. वेगवेगळ्या समाजाचे मेळावे घेऊन पवार लेकीसाठी मोट बांधताना दिसतात. पवार फक्त मेळावे आणि छोट्या-मोठ्या सभा घेऊनच थांबले नाहीतर ते कट्टर विरोधकांच्या, दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यात पहिलं नाव येतं ते म्हणजे 25 वर्षांपासूनचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटेंची घेतलेली भेट...