Exit Poll : महाराष्ट्रात NDA ला जबर झटका, INDIA आघाडीचं काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

india today and axis my india exit poll 2024 bjp nda big blow how many seat get india alliance maha vikas aghadi mahayuti lok sabha 2024
महाराष्ट्रातील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
social share
google news

Maharashtra Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी (Lok Sabha Election Result) एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहिले असता अनेक राज्यातील निकाल हा खुपच धक्कादायक लागला आहे. विशेष करून महाराष्ट्रातील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या महाराष्ट्रात भाजपप्रणित एनडीएला (BJP NDA) गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहे.  2019 च्या निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपला ना 45 पार जाता आले आहे, ना त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एनडीएने नेमक्या किती जागा जिंकल्या आहेत. हे जाणून घेऊयात. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होतं आहे. त्यामुळे राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती. यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एनडीएच्या आघाडीत आहे, तर ठाकरेंची शिवसेना युबीटी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीत आहे. 

हे ही वाचा : महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये 'हे' उमेदवार जिंकणार? संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील एक्झिट पोलचे आकडे 
 एक्झिट पोल एजन्सी NDA INDIA Other 
India Today- Axis My India 28-32 16-20 00-02
ABP- CVoter 22-26 23-25 00-00
News18 32-35 15-18 00-00
Chanakya 28-38 10-20 00-00
India TV- CNX 24-32 17-24 00-00
TV9- Polstrat 22-22 25-25 01-01
Times Now- ETG 26-26 22-22 00-00

2019 च्या तुलनेत कमी जागा 

इंडिया टूडे ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपप्रणित एनडीएला 48 पैकी 28 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या आकड्यानुसार महाराष्ट्रात एनडीएला 46 टक्के मतं मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला 43 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. त्यानुसार इंडिया आघाडीला 16 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे वाचलं का?

कोणत्या पक्षाला किती जागा? 

इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजप सर्वाधिक 20-22 जागा जिंकेल. भाजपनंतर शिवसेनेला सर्वाधिक 9-11 जागा मिळतील. शिवसेना शिंदे गटाला 8-10, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद गटाला 3-5, काँग्रेस 3-4, राष्ट्रवादीला 1-2 आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.

हे ही वाचा : Maharashtra Exit Poll : सांगली, बारामती कुणाचा 'गेम'? पहा एक्झिट पोल

2019 च्या लोकसभेचा निकाल काय? 

 लोकसभेच्या 2019 च्या निकालानुसार महाराष्ट्रातील 48 जागांमधून 42 जागांवर भाजप प्रणित एनडीएने जिंकल्या होत्या. तर 6 जागा या काँग्रेस आणि इतर पक्षांना आल्या होत्या. एनडीएला मिळालेल्या 42 जागांपैकी भाजपला  23, शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला  4 आणि काँग्रेसला 1 इतर पक्षांना 1 जागा आल्या होत्या.  पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीपुर्वी महाराष्ट्रातील पक्षांचे समीकरण पूर्णपणे बदलले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून, त्यातील एक गट भाजपसोबत तर दुसरा गट काँग्रेससोबत आहे. त्यामुळे या फुटीचा फटका एनडीएला बसला आहे. 

ADVERTISEMENT

दरम्यान हा एक्झिट पोलचा अंदाज आहे.आता 4 जून रोजी येणाऱ्या निकालात कोणाला किती जागा मिळतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT