Exit Poll : 12 जागांवरील निकाल महाराष्ट्राला देणार धक्का! पाहा कोणते मतदारसंघ

मुंबई तक

ADVERTISEMENT

 india today axis my india exit poll these 12 seat big blow in maharashtra lok sabha shiv sena ubt eknath shinde shivsena Ajit pawar ncp sharad pawar ncp bjo mahayuti vs maha vikas aghadi
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघा एक दिवस उरला आहे.
social share
google news

India Today Axis My India Exit Poll Maharashtra Lok Sabha : देशातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालाला अवघा एक दिवस उरला आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. असे असताना इंडिया टूडे अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट (India Today Axis My India Exit) पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील 12 जागांवरील निकाल खूप धक्कादायक लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे 12 मतदारसंघ कोणते आहेत? आणि या मतदार संघात नेमका काय धक्कादायक निकाल लागणार आहेत. हे जाणून घेऊयात. (india today axis my india exit poll these 12 seat big blow in maharashtra lok sabha shiv sena ubt eknath shinde shivsena Ajit pawar ncp sharad pawar ncp bjo mahayuti vs maha vikas aghadi) 

India Today Axis My India Exit Poll नुसार, 'या' मतदार संघात कोण बाजी मारणार?

यवतमाळ-वाशिम : या मतदार संघात ठाकरे आणि शिंदेंच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर होते आहे.  ठाकरेंचे उमेदवार संजय देशमुख जिंकण्याची शक्यता इंडिया टूडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर राजश्री पाटील या पराभयाच्या छायेत असल्याचा अंदाज आहे.

नांदेड : नांदेड मतदार संघात तिरंगी लढत सूरू आहे. या मतदार संघात तिन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. पण इंडिया टूडेच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या पराभवाचा अंदाज आहे. आणि वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर तिसऱ्या स्थानी राहण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : अजित पवारांच्या उमेदवाराविरोधातच भाजपने दिला उमेदवार!

छ.संभाजीनगर (औरंगाबाद) : या मतदार संघात देखील तिरंगी लढत होतेय. पण ठाकरे आणि शिंदेंच्या उमेदवारामध्ये टफ फाईट होताना दिसतेय.  इंडिया टूडेच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विजयी होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाचे संदिपान भुमरे पराभवाच्या छायेत असल्याचा अंदाज आहे. आणि एमआयएमचे इम्तियाज जलील तिसऱ्या स्थानी राहण्याचा पोलचा अंदाज आहे. 

भिवंडी : या मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) जिंकण्याचा अंदाज इंडिया टूडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. भाजपचे कपिल पाटील पराभूत होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

ठाणे : या मतदार संघात ठाकरे आणि शिंदेंचे उमेदवार आमने सामने आहेत. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, शिंदे गटाचे नरेश म्हस्के जिंकतील असा अंदाज आहे, तर ठाकरे गटाचे राजन विचारे पराभूत होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

मुंबई उत्तर पश्चिम : या मतदार संघात देखील ठाकरे आणि शिंदेंच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होते आहे.  इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांच्यात टफ फाईट होते आहे. पण पोलनुसार, रवींद वायकर जिंकण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे, तर ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पराभूत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबई उत्तर मध्य : या मतदार संघात भाजप आणि काँग्रेसमध्ये तगडी फाईट सुरू आहे. पण भाजप उमेदवार उज्ज्वल निकम जिंकू शकतात आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा पराभव होईल, असा अंदाज इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 

हे ही वाचा : Mumbai Crime : IAS अधिकाऱ्याच्या लेकीची मुंबईत आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय?

मुंबई दक्षिण मध्य : या मतदार संघात ठाकरे आणि शिंदेंच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होतं आहे. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार या मतदार संघात ठाकरे गटाचे अनिल देसाई जिंकतील असा अंदाज आहे. तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे पराभूत होतील, असा अंदाज आहे. 

मावळ  : या मतदार संघात देखील ठाकरे आणि शिंदेंच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होते आहे. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार या मतदार संघात ठाकरे गटाचे संजोग वाघेरे जिंकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शिंदे गटाचे श्रीरंग बारणे पराभवाच्या छायेत असल्याचा अंदाज आहे. 

माढा : इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार या मतदार संघात भाजप उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील पराभूत होतील, असा अंदाज आहे. 

सांगली : या मतदार संघात सगळ्यात धक्कादायक निकाल लागणार आहे. कारण इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकण्याचा अंदाज आहे. तर भापजच्या संजयकाका पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तिसऱ्या स्थानी राहण्याचा अंदाज आहे. 

कोल्हापूर : या मतदार संघात काँग्रेस आणि शिंदे गटात लढत होते आहे. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार शिंदे गटाचे संजय मंडलीक जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस उमेदवार शाहु महाराज छत्रपती यांचा पराभव होण्याचा अंदाज आहे. 

मविआ-महायुतीला किती जागा? 

India Today-Axis My India एक्झिट पोलनुसार, महायुतीला आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 28 ते 32 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये भाजपला तब्बल 20 ते 22, शिवसेना (शिंदे गट) 8 ते 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 1 ते 2 जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात.तर महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 16 ते 20 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये शिवसेना (UBT)पक्षाला 9 ते 11, काँग्रेसला 3 ते 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 3 ते 5 जागांवर उमेदवार विजय मिळवू शकतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT