Jalana Lok sabha : दानवेंच्या अडचणी वाढणार, 'या' पक्षाचा डॉ. कल्याण काळेंना पाठिंबा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

jalana lok sabha election 2024 raju shetti swabhimani shetkari sanghatana support dr kalyan kale mahayuti candidate raosaheb danve
सहाही विधानसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटना कल्याण काळेंना पाठिंबा देणार आहे.
social share
google news

Swabhimani Shetkari Sanghatana, Raju Shetti Support Dr kalyan kale : जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb danve)  यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.कल्याण काळे (Dr kalyan kale) यांना राजू शेटटीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) पाठिंबा जाहीर केला आहे. सहाही विधानसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटना कल्याण काळेंना पाठिंबा देणार आहे.त्यामुळे डॉ. कल्याण काळेंची ताकद चांगलीच वाढणार आहे.  (jalana lok sabha election 2024 raju shetti swabhimani shetkari sanghatana support dr kalyan kale mahayuti candidate raosaheb danve)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जालना मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जालन्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली आहे. कल्याण काळे यांनी सर्व मागण्यांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केल्यानंतर सहाही विधानसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. 

हे ही वाचा :अदाणी-अंबानीवरून मोदींना पवारांनी घेरलं, 'दोस्त तुमचे अन् काँग्रेसवर...'

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने जालन्यात डॉ. कल्याण काळे यांची ताकद चांगलीच वाढणार आहे.कारण राज्यातील शेतकरी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावर आधीच नाराज आहेत. कांदा निर्यातीच्या मुद्यावरून देखील शेतकरी आणखीणच संतापला आहे. अशा परिस्थितीत स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने डॉ. कल्याण काळेंना पाठींबा दिल्याने, संपूर्ण शेतकरी मते काँग्रेसच्या पारड्यात जाणार आहे. या मतांचा निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जालना जिल्ह्यात मक्याच क्षेत्र मोठं असतानाही विद्यमान खासदारांनी जिल्ह्यात एकही मका प्रक्रिया उद्योग आणला नाही. मोसंबीचा आगाम म्हणून जालना आणि संभाजीनगर जिल्हा ओळखला जातो. पण जिल्ह्यात एकही मोसंबीचे प्रक्रिया केंद्र उघडलं नाही, सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेणे हे भापजचे धोरण राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मरण होतं आहे. त्यामुळे आम्ही एक सक्षम पर्याय म्हणून डॉ. कल्याण काळे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा : Ajit Pawar : "मी शरद पवारांना सोडतच नव्हतो", अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

पाठिंब्यावर डॉ. काळे काय म्हणाले? 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अटी शर्थी उपस्थित केल्या होत्या. त्या मागण्या खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा अन्नदाता, पोषणकरता या संदर्भात असल्याने मी त्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा दिला. आणि हा पाठिंबा केवळ निवडणुकीपुरता नाही तर निवडून आल्यावर पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांच्या खांद्याशी खांदा लावून काम करू असे कल्याण काळे यांनी म्हटले आहे. तसेच शेतकरी संघटनेने पाठिंबा दिल्याने मला आताच निवडणुकीत निवडून आल्याचं वाटायला लागलं आहे अशी खात्री काळे यांनी व्यक्त केली. 

ADVERTISEMENT

दरम्यान आता स्वाभिमानी संघटनेने डॉ. काळेंना पाठिंबा जाहीर केल्याने याचा निकालावर किती परिणार होणार आहे. हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT