कंगना रणौत यांच्या लगावली कानशिलात? विमानतळावर राडा, घडलं काय?
Kangana Ranaut : चंदिगड विमानतळावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याची माहिती आहे. नेमकं खरं काय हे अद्याप समोर आलेलं नाही आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कंगना यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

खासदार पदासाठी कंगना यांना मंडीतून मोठा विजय

कंगना राणौत यांचे फिल्मी करिअर
चंदिगड विमानतळावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याची माहिती आहे. नेमकं खरं काय हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. पण कंगना यांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांना विमानाने दिल्लीला जायचं होतं. सिक्युरिटी चेक इननंतर त्या बोर्डिंगसाठी जात असताना एलसीटी कुलविंदर कौर (सीआयएसएफ युनिट चंदीगड विमानतळ) हिने कानशिलात लगावली. त्यानंतर कंगना राणौत यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. कंगना यांच्या आरोपावरून आता CISF महिला जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे.
कंगना यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
कंगना रणौत दिल्लीत पोहोचल्या असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी CISF च्या महासंचालक नीना सिंह यांना घटनेची माहिती दिली आहे. कंगना यांनी दावा केला आहे की, CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने त्यांच्याशी वाद घातला आणि चंदीगड विमानतळावर महिलांची चेकिंग करतात त्या पडद्याच्या भागात कानशिलात लगावली. कॉन्स्टेबल कुलविंदरला सीओ रूममध्ये ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी सुरू आहे. चंदीगड विमानतळावर CISF कडून सीसीटीव्ही तपासले जात आहेत.
हेही वाचा : मोदींचं नाणं महाराष्ट्रात वाजलंच नाही, 19 सभा घेतल्या पण किती उमेदवार जिंकले?
खासदार पदासाठी कंगना यांना मंडीतून मोठा विजय
बॉलिवूडच्या क्वीन कंगना राणौत आता राजकारणातल्या क्वीन बनल्या आहेत. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार कंगना रणौत विजयी झाल्या आहेत. कंगना यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि विद्यमान खासदार पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून विजयाचा झेंडा फडकावला आहे.
हेही वाचा : "तिकीट न देण्यासाठी एकनाथ शिंदेंवर होता दबाव", शिवसेना नेत्याने फोडला बॉम्ब
कंगना राणौत यांचे फिल्मी करिअर
कंगना राणौत यांच्याबद्दल सांगायचं तर, त्या हिमाचल प्रदेशच्या रहिवासी आहेत. मॉडेलिंगनंतर त्यांनी 2006 मध्ये गँगस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 18 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये कंगना यांनी अनेक चित्रपट केले आहेत, ज्यात फॅशन, क्वीन, क्रिश 3, तनू वेड्स मनू आणि क्वीन सारखे हिट चित्रपट आहेत.