Lok Sabha Election 2024: Lokniti-CSDS सर्व्हेमध्ये मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा?, NDA की INDIA.. कोण जिंकणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

NDA की INDIA.. कोण जिंकणार?
NDA की INDIA.. कोण जिंकणार?
social share
google news

Lokniti-CSDS Survey: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी लोकनिती-CSDS नुकताच एक सर्व्हे केला आहे. ज्यामध्ये देश पातळीवर अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जनतेचा देखील कौल जाणून घेण्यात आला आहे. मात्र, हा सर्व्हे मोदी सरकारसाठी काहीशी चिंता वाढवणारा आहे. (lok sabha election 2024 alarm bell for modi government in lokniti csds survey nda or india who will win)

CSDS सर्व्हेनुसार, देशातील  44 टक्के लोकांना वाटतंय की, मोदींना पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे. पण 39 टक्के लोकांना वाटतंय की, मोदींनी सत्तेत येऊ नये. तर 17 टक्के लोकांनी सांगता येत नाही. आता हीच आकडेवारी मोदींच्या सरकारसाठी चिंतेची बाब आहे. 

कारण 2019 च्या तुलनेत मोदींचं सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये या मतामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. 2019 मध्ये 47 टक्के देशातील लोकांनी असं म्हटलं होतं की, मोदींना पुन्हा सत्ता बहाल केली पाहिजे. तर 35 टक्के लोकांनी मोदी सरकार येऊ नये असं म्हटलं होतं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याच आकडेवारीचा विचार केल्यास मोदींचं सरकार येऊ नये या मतामध्ये आता एकूण चार टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मोदींचं सरकार सत्तेत पुन्हा यावं या मतात 3 टक्क्यांची घट झाली आहे. 

मात्र, असं असलं तरीही देशात भाजपला 40 टक्के लोकांची पसंती आहे. तर काँग्रेसला 21 टक्के पसंती असल्याचं सर्व्हेमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे आता निवडणुकीत देशातील जनता नेमकं काय कौल देतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

पाहा CSDS सर्व्हेतील जनतेचा नेमका कौल काय आहे.. 

भारतात भाजपच्या मतांची टक्केवारी कुठे किती? 

  • उत्तर, पश्चिम - 47 टक्के (2019 ला 48 टक्के मतांची टक्केवारी होती)
  • दक्षिणेत - 25 टक्के (2019 ला 18 टक्के मतांची टक्केवारी होती)
  • पूर्व, ईशान्य- 42 टक्के (2019 ला 34 टक्के मतांची टक्केवारी होती)

भारतात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी कुठे किती?

  • उत्तर, पश्चिम - 24 टक्के (2019 ला 22 टक्के मतांची टक्केवारी होती)
  • दक्षिणेत - 23 टक्के (2019 ला 20 टक्के मतांची टक्केवारी होती)
  • पूर्व, ईशान्य- 14 टक्के (2019 ला 12 टक्के मतांची टक्केवारी होती)

मोदी सरकारला पुन्हा संधी मिळावी का?

(2024 मधील सर्व्हेतील अंदाज)

ADVERTISEMENT

  • हो - 44 टक्के 
  • नाही - 39 टक्के
  • सांगता येत नाही - 17 टक्के 

(2019 मधील सर्व्हेतील अंदाज)

  • हो - 47 टक्के 
  • नाही - 35 टक्के
  • सांगता येत नाही - 18 टक्के 

पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती 

  • नरेंद्र मोदी - 48 टक्के 
  • राहुल गांधी - 27 टक्के 
  • ममता बॅनर्जी - 3 टक्के
  • अरविंद केजरीवाल - 3 टक्के
  • अखिलेश यादव - 3 टक्के

आज निवडणुका झाल्यास कोणत्या पक्षाला पसंती? 

  • भाजप - 40 टक्के पसंती 
  • भाजप + मित्रपक्ष - 6 टक्के पसंती
  • काँग्रेस - 21 टक्के पसंती
  • काँग्रेस + मित्रपक्ष - 13 टक्के पसंती
  • इतर - 20 टक्के पसंती

लोकसभेसाठी महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी 

  • NDA - 44 टक्के मतं मिळण्याची शक्यता 
  • MVA - 40 टक्के मतं मिळण्याची शक्यता

कुणाच्या कामावर महाराष्ट्राची जनता किती समाधानी? 

  • मोदी सरकार - 46 टक्के लोकं मोदींच्या सरकारवर 46 टक्के जनता समाधानी असल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे.
  • शिंदे सरकार - 22 टक्के लोकं शिंदेंच्या सरकारवर 22 टक्के जनता समाधानी असल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे.

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT