Lok Sabha Election 2024: भाजपचे 250 हून अधिक उमेदवार जाहीर, पण महाराष्ट्रातील फक्त... पाहा संपूर्ण यादी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेली आतापर्यंतची संपूर्ण यादी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेली आतापर्यंतची संपूर्ण यादी
social share
google news

BJP Candidate list for Lok Sabha Election 2024: मुंबई: भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी 2024 ची दुसरी यादी काल (13 मार्च) जाहीर केली आहे. बुधवारी पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत 10 राज्यांतील एकूण 72 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. भाजपच्या या यादीत तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या नावांचा समावेश आहे. (lok sabha election 2024 bjp announced more than 250 candidates but announced only 20 candidates from maharashtra see the complete list)

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी 20, गुजरातमधील 7, हरियाणा आणि तेलंगणातील प्रत्येकी 6, मध्य प्रदेशातील 5, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी 2 आणि त्रिपुरामधील प्रत्येकी 1 उमेदवाराचा समावेश आहे. दादर आणि नगर हवेलीचा समावेश आहे.

हे ही वाचा>> BJP 2nd list: महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर, तब्बल...

भाजपच्या या यादीत नागपूरचे विद्यमान खासदार आणि कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत गुजरातमध्ये जाहीर करण्यात आलेल्या 7 पैकी 5 चेहरे नवे आहेत. दिल्लीचे दोन्ही चेहरे नवे आहेत. हरियाणातील 6 पैकी 3 चेहरे नवे आहेत, तर हिमाचल प्रदेशातील दोन्ही उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कर्नाटकात ज्या 20 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत, त्यात 10 नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील 5 पैकी 3 चेहरे, उत्तराखंडमध्ये आणि महाराष्ट्रात 20 पैकी 6 चेहरे नवीन आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यापूर्वी 2 मार्च रोजी भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची घोषणा केली होती. भाजपच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, मध्य प्रदेशातील 24, पश्चिम बंगालमधील 20, गुजरात आणि राजस्थानमधील 15-15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाम, छत्तीसगड आणि झारखंडमधील 11-11, दिल्लीतील 5, द. उत्तराखंडमधील प्रत्येकी 3, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी दोन आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान निकोबार बेटे आणि दमण दीवमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

हे ही वाचा>> Lok Sabha : भाजपने दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचं तिकीट कापलं!

भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव होते. ते तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांचीही नावे आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत अमित शहा आणि राजनाथ सिंह या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह शिवराज सिंह चौहान, बिप्लब कुमार देब आणि सर्बानंद सोनोवाल या दिग्गज नेत्यांची नावेही समाविष्ट आहेत.

ADVERTISEMENT

दोन्ही याद्या एकत्र करून भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 267 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

ADVERTISEMENT

पाहा भाजपने आतापर्यंत जाहीर केलेली सर्व उमेदवारांची यादी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT