Nashik: अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकचा उमेदवार जाहीर, 'हा' नेता रिंगणात

ऋत्विक भालेकर

Lok sabha election 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने अखेर नाशिकचा उमेदवार जाहीर केला आहे. पाहा शिंदेंनी नेमकं कोणाला दिलं तिकीट?

ADVERTISEMENT

नाशिकचा उमेदवार  जाहीर, 'हा' नेता रिंगणात
नाशिकचा उमेदवार जाहीर, 'हा' नेता रिंगणात
social share
google news

Hemant Godse: नाशिक: लोकसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने अखेर महिन्याभराच्या प्रदीर्घ चर्चेनंतर महायुतीचा उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांच्या नावाची आज (1 मे) घोषणा केली.

अखेर अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा कोणाला मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता.

राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकची जागा मिळावी यासाठी बराच जोर लावला होता. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ हेच निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चाही सुरू होती. तर दुसरीकडे ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी हेमंत गोडसे यांनी शेवटपर्यंत मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणं लावून धरलं. अखेर आज याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला.

हे ही वाचा>> शिंदेंचे लोकसभेचे 15 उमेदवार ठरले! कोणत्या जागा गमावल्या? पहा संपूर्ण यादी

 

हे वाचलं का?

    follow whatsapp